Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Price Drop : तूर बाजारात येण्यापूर्वीच मोठी दरघसरण; शेतकरी चिंतेत

Tur Market : कापूस, सोयाबीननंतर आता तुरीच्या दरात घसरण झाली आहे. काही दिवसांपर्यंत बाजारात तुरीच्या दरात तेजी होती. शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : कापूस, सोयाबीननंतर आता तुरीच्या दरात घसरण झाली आहे. काही दिवसांपर्यंत बाजारात तुरीच्या दरात तेजी होती. शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली आहे. खासगी बाजारात नवीन तुरीचे दर ७००० ते ७३०० असून, जुन्या तुरीचे दरही साडेसात ते आठ हजार रुपयांवर आले आहे.

यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कापूस, सोयाबीननंतर आता तुरीच्या दराबाबतही तशीच अवस्था झाली आहे. एप्रिल महिन्यात तुरीच्या दराने उसळी घेतली होती. ती डिसेंबर महिन्यापर्यंत टिकून होते. तुरीला चांगले दर असल्याने कापूस, सोयाबीनमधील तफावत काही प्रमाणात भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

शेतकऱ्यांची नवीन तूर घरात येण्यास सुरुवात होताच तुरीचे दरही घसरले आहे. यवतमाळ खासगी बाजारात जुन्या तुरीचे दर आठ हजारांवर आले असून नवीन तुरीला ओलाव्यामुळे सात ते सात हजार तीनशे रुपयेच दर मिळत आहे. नवीन तुरीत ओलाव्याचे कारण दिले जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

यातच तुरीसाठी आधारभूत किमतीने ऑनलाइन नोंदणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आधारभूत केंद्राकडे लागल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत आधारभूत केंद्रांकरिता नोंदणीची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी होत आहे.

विदर्भात सात हजार रुपयांच्या आत दर

विदर्भातील बहुतांश बाजारात तुरीचे दर सात हजार रुपयांच्या आत स्थिरावले आहेत. दुसरीकडे तुरीला ७५५० रुपयांचा हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केला आहे. सध्या बाजारात नव्या तुरीची आवक होताच, दर मात्र ७००० रुपयांच्या खाली आले आहेत. शेगाव बाजार समितीत ५९०० ते ७००१ रुपये असा दर तुरीला होता. अमरावती बाजार समितीत सध्या नव्या तुरीची अवघी १३ क्विंटल एवढी अत्यल्प आवक होत आहे. या ठिकाणी देखील ओलावा अधिक असल्याने तुरीचे दर दबावात आहे.

कारंजा बाजार समितीत जुन्या तुरीचे दर तेजीत

वाशीम जिल्ह्याच्या कारंजा बाजार समितीत ओलाव्याचे प्रमाण पाहून ६२५५ ते ७७०१ रुपये असा तुरीला दर मिळत आहे. त्यामध्ये नव्या तुरीला दर कमी असल्याचे सांगितले जाते. कारंजा लाड बाजार समितीत तुरीची आवक तीनशे क्विंटलच्या घरात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT