Nanded News: रासायनिक खतांच्या किमतीत गेल्या वर्षभरात वाढ झाल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना नायगाव तालुक्यात अधिकच्या दराने खतांची विक्री होत आहे. या खतासोबत इतर निविष्ठांची सक्ती (लिंकिंग) केली जात असल्याने ’शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे गजानन पाटील होटाळकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देवून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे..सध्या नायगाव तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची पेरणी सुरु आहे. योसाबतच बागायती पिकात ऊस, हळद या पिकांसाठी खतांची मोठी मागणी आहे. मात्र, बाजारात खतांचे दर वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. .Fertilizer Demand : खरिपासाठी १ लाख ५९ हजार टन रासायनिक खतांची मागणी.१०:२६:२६ या खताची किंमत १४५० रुपयांवरून १९०० रुपये, १२:३२:१६ या ग्रेडच्या खताच्या दरात २२० रुपयांची वाढ होऊन ते १९४० रुपये तर १५:१५:१५ च्या दरात २०० रुपयांची वाढ होऊन ते १६५० रुपयांवर पोहोचले आहे. ’पोटॅश’ या खताची किंमत दोन वर्षांपूर्वी ११०० रुपये होती, ती आता १८५० रुपयांवर पोहोचली आहे. .Fertilizer Liking : रब्बी हंगामातही रासायनिक खतांची मोठी टंचाई | ॲग्रोवन.या दरवाढीमुळे आणि २०:२०:०:१३ च्या दरात झालेल्या १०० रुपयांच्या वाढीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. खताची भाववाढ आणि यासोबत’लिंकिंग’चा प्रकार होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ’डीएपी’ खताच्या गोणीसोबत ’नॅनो डीएपी’ घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर केली जात आहे. यासोबतच नायगाव तालुक्यात सर्वच खते अधिकच्या दराने विक्री होत आहेत. याबाबत गुणनियंत्रण विभाग मात्र झोपेत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. .विशेषतः नायगाव येथील गुणनियंत्रण अधिकारी सक्षम नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने खत कंपन्या आणि पुरवठा साखळीची उच्चस्तरीय चौकशी करावी, शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन अनुदान वाढवून द्यावे आणि उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव धोरण राबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गजानन पाटील होटाळकर यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.