फ्यूचर्स किमती ः सप्ताह- ८ ते १४ फेब्रुवारी २०२५
तुरीची आवक वाढती आहे. ७ मार्च २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात विक्रमी म्हणजे ८० हजार टन आवक झाली. गेल्या तीन वर्षांत (२०२२ ते २०२४) सर्वांत अधिक साप्ताहिक आवक अनुक्रमे ६७, ६४ व ६६ हजार टन झाली होती. त्या तुलनेत या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.
यातील बहुतेक आवक महाराष्ट्र (६७ टक्के), कर्नाटक (१२ टक्के), मध्य प्रदेश व गुजरात (प्रत्येकी ७ टक्के) या राज्यांत झाली. महाराष्ट्रात खामगाव, जालना व लातूर या बाजारांत जास्त आवक झाली. या मोठ्या आवकेचा परिणाम म्हणून तुरीच्या किमती घसरल्या व त्या आता हमीभावापेक्षा कमी झाल्या आहेत. इतर पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. हरभऱ्याची आवक या महिनाअखेर सुरू होईल.
या सप्ताहात कापूस, मका व कांदा वगळता सर्व पिकांच्या किमती कमी झाल्या. सोयाबीनच्या किमती अल्प प्रमाणात वाढल्या. कांद्याच्या किमतीसुद्धा वाढल्या.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात १.१ टक्क्याने वाढून रु. ५३,६०० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव ०.५ टक्क्याने वाढून रु. ५४,००० वर आले आहेत. मे भाव रु. ५५,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. सध्या तरी स्पॉट भावाने विकणे योग्य ठरेल.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात एक टक्का वाढून रु. १,४१० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स ०.१ टक्का वाढून रु. १,४७७ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,३५० वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी वाढून रु. २,४०० वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती २ टक्क्यांनी वाढून रु. २,४१६ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स रु. २,४४५ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.९ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात २.९ टक्क्यांनी घसरून रु. १२,९२९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ५.३ टक्क्यांनी घसरून रु. १२,७८६ वर आल्या आहेत. मे किमती रु. १२,६४६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.२ टक्क्यांनी अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक पुढील सप्ताहापासून वाढती राहील.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७.९२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २ टक्क्यांनी
घसरून रु. ४,२२९ वर आली होती. या सप्ताहात ती ०.३ टक्का वाढून रु. ४,२४२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहेत.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्का घसरून रु. ७,५९७ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,३२९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव बसवंत) किंमत या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने वाढून रु. २,६२५ वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) वाढून रु. १,००० वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा रु. ९०० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.