Chana Production : रब्बीत एक लाख हेक्टरवर हरभरा उत्पादन

Chana Cultivation : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीत एक लाख ७ हजार ७८४ हेक्टरवर हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे.
Chana Farming
Chana CultivationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीत एक लाख ७ हजार ७८४ हेक्टरवर हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे. सरासरीपेक्षक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे सांगण्यात आले. अहिल्यानगर, कर्जत, पाथर्डी, राहाता या तालुक्यांत हरभऱ्याचे क्षेत्र अधिक आहे. यंदा उत्पादकताही चांगली निघेल अशी स्थिती असल्याचे शेतकरी सांगतात.

अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. कृषी विभागाच्या अंतिम अहवालानुसार यंदा आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ३६२ हेक्टवर (९७.९८) रब्बीची पेरणी झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रब्बीत ज्वारीपाठोपाठ हरभऱ्याचे प्रमुख पीक असते.

मात्र अलिकडच्या दहा वर्षांचा विचार केला सरासरी एवढी पेरणी होत असली तरी तर हरभऱ्याचे क्षेत्र फारसे वाढायला तयार नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील अन्य कृषी विद्यापीठानेही अधिक उत्पादनासाठी हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले आहे. थेट यंत्राने काढणी करता यावी असेही वाण त्यात आहेत.

Chana Farming
Chana Cultivation : हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन

हरभऱ्याचे यंदा ८८ हजार ३७६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा एक लाख ७ हजार ७८४ हेक्टरवर (सरासरीच्या १२१.९६ टक्के) पेरणी झाली आहे. यंदाही गेल्यावर्षी एवढ्या क्षेत्रावर पेरणी झाल्याचे दिसत आहे. जिल्‍ह्यात यंदा प्रामुख्याने अहिल्यानगर, कर्जत, पाथर्डी, राहाता या तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र अधिक आहे.

Chana Farming
Chana Cultivation : काबुली हरभरा पेरा पूर्ण

अकोले, संगमनेर, जामखेड, शेवगाव, नेवासा तालुक्यांतही हरभऱ्याचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. यंदा नैसर्गिक वातारण चांगले असल्याने हरभऱ्याचे पीक जोमात आहे. त्यामुळे उत्पादकताही अधिक असेल असे शेतकरी सांगत आहेत. काही भागात हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढताच दरात तफावत दिसू लागली आहे. हरभऱ्याची सरकारी खरेदी करण्याबाबतही अजून कोणतीही हालचाल दिसत नाही.

तालुकानिहाय हरभऱ्याचे क्षेत्र (हेक्टर)

अहिल्यानगर ः १६४३९, पारनेर ः ८०८८, श्रीगोंदा ः ७८००, कर्जत ः १२०३७, जामखेड ः ७३६५, शेवगाव ः ७३०६, पाथर्डी ः ११४५०, नेवासा ः ४३६६, राहुरी ः २५३९, संगमनेर ः ६१९३, अकोले ः ३४४०, कोपरगाव ः ५२९१, श्रीरामपूर ः ४५५२, राहाता ः १०९१७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com