Pune News: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २१) राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पाऊस आणि उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..राज्यात अंशतः उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. तसेच किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे. सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३५.८ अंश सेल्सिअस, डहाणू, ब्रह्मपुरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, अकोला, जळगाव, चंद्रपूर येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली..Monsoon Rain: राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता.आज (ता. २१) सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह, मुख्यतः कोरडे हवामान, आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..दोन्ही समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यताआग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे आज (ता. २१) आग्नेय बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रापासून ते वरील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..सोमवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.३---१९.४अहिल्यानगर---३२.१---निरंकधुळे---३३.०---१८.५जळगाव---३४.०---२२.५जेऊर---३३.५---१७.०कोल्हापूर---३२.२---२२.१.October Heatwave : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम.महाबळेश्वर---२५.८---१६.२मालेगाव---३२.०---२१.६नाशिक---३१.०---२०.५निफाड---३१.९---१९.९सांगली---३२.५---२१.८सातारा---३१.६---२०.१सोलापूर---३४.९---२१.६सांताक्रूझ---३५.८---२५.१.डहाणू---३५.७---२४.४रत्नागिरी---३४.६---२३.७छत्रपती संभाजीनगर---३२.०---२०.२धाराशिव---३२.२---२०.०परभणी---३२.९---२०.०परभणी (कृषी)---३२.६---१८.०अकोला---३४.१---२२.१अमरावती---३४.४---१९.९भंडारा---३१.०---२२.०.बुलडाणा---३१.६---२१.४ब्रह्मपुरी---३५.०---२१.०चंद्रपूर---३४.०---२२.८गडचिरोली---३२.४---२२.६गोंदिया---३१.९---१८.६नागपूर---३२.६---२०.२वर्धा---३२.६---२०.०वाशीम---३२.२---२०.६यवतमाळ---३२.०---१९.०.विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली.विजांसह पावसाची शक्यता :रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :सांताक्रूझ ३५.८, डहाणू ३५.७, ब्रह्मपुरी ३५, सोलापूर ३४.९, रत्नागिरी ३४.६, अमरावती ३४.४, अकोला ३४.१, जळगाव ३४, चंद्रपूर ३४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.