Cotton Market: कापूस बाजार स्थिर! खासगी बाजारात दर ७२०० रुपयांवर

Cotton Trading Trend: बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड सीसीआयकडून खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खासगी बाजारात कापूस विक्रीवर भर दिला जात आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News: बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड सीसीआयकडून खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खासगी बाजारात कापूस विक्रीवर भर दिला जात आहे. सध्या खासगी बाजारात कापसाला सरासरी ७२०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

भारतीय कापूस महामंडळाकडून हमीभावाने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. नोव्हेंबरऐवजी डिसेंबर महिन्यात खरेदीचा मुहूर्त निघाला. त्यानंतर साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणाआड कापूस खरेदी काही दिवसांकरिता बंद करण्यात आली. ती सुरू होणार तोच बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याचे कारण देत पुन्हा खरेदीला स्थगिती देण्यात आली आहे.

Cotton Market
Cotton Price : कापूसदर दबावातच आवकेत वाढ

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. खरिपात कर्जाची उपलब्धता व्हावी याकरिता शेतकरी कापूस विक्रीवर भर देतात. या पैशातून जुन्या कर्जाची परतफेड करीत नवे कर्ज घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. त्यामुळे सद्यःस्थितीत शेतकऱ्यांचा कल कापूस विक्रीवर आहे.

परिणामी, खासगी बाजारात कापसाची आवक वाढल्याचे वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक बालाजी ढोबे यांनी सांगितले. दरात तेजीच्या अपेक्षेने शेतकरी कापसाची साठवणूक करतात. मात्र एप्रिलनंतर कापसाची प्रत अधिक खालावते, कापूस पिवळा पडतो. त्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही, असेही बालाजी ढोबे सांगतात.

Cotton Market
Cotton Mechanization : कपाशी पिकात यांत्रिकीकरण गरजेचे ; डॉ. प्रसाद

दरम्यान, सीसीआयकडून सुरुवातीला ७५२१ रुपये क्‍विंटल या हमीभावाने कापसाची खरेदी झाली. त्यानंतर कापसाची प्रत अपेक्षित नसल्याचे सांगत हा दर ७४२१ रुपये करण्यात आला. सद्यःस्थितीत ७४२१ रुपये क्‍विंटलनेच खरेदी होत आहे. यापुढील काळात कापसाची अपेक्षित प्रत मिळत नसल्याने दर आणखी कमी होण्याची शक्‍यता असताना तांत्रिक कारणाआड खरेदीच बंद करण्यात आली.

...असा राहिला दराचा कल

डिसेंबर महिन्यात खासगी बाजारात कापूस खरेदीचा दर ७३२५ रुपयांवर दर होता त्यानंतर जानेवारीत ७००० रुपयांवर पोहोचला आता ७२०० रुपये क्‍विंटलने कापसाची खरेदी होत आहे. हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत सद्यःस्थितीत ५२५ कापूस गाड्यांची आवक होत त्याला सरासरी ६९०० ते ७३२५ रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. अमरावती बाजार समितीत ७५ क्‍विंटल कापूस आवक होत याला ७१०० ते ७४२५ रुपये क्‍विंटलचा दर मिळाला.

आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीला सीसीआय खरेदीचे केंद्र मंजूर झाले होते. त्या माध्यमातून ४० हजार क्‍विंटल, तर आमच्या कंपनीची खासगी खरेदी ४७ हजार क्‍विंटलवर पोहोचली आहे. वरोरा तालुक्‍यात ९ जिनिंग आहेत. त्यामुळे प्रक्रियेकामी मोठ्या प्रमाणावर कापसाची गरज राहते.
बालाजी ढोबे, संचालक, कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, वरोरा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com