Washim News: यंदा सततच्या पावसामुळे सोयाबीनची पीक हातचे गेले असून उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. त्यातच बाजारपेठांमध्ये हमीभावापेक्षा एक ते दीड हजार रुपयांनी सोयाबीन कमी किमतीने विकत असल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे..मागील तीन वर्षांपासून सोयाबीनचे भाव चार हजारांच्या आसपास स्थिरावले आहेत. या वर्षी जूनपासून सतत पाऊस, तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याची खरिपातील महत्त्वाचे पीक हातचे गेले. उत्पादनात अर्ध्यापेक्षा जास्त घट आली आहे. त्यातच सोयाबीन हमीभावापेक्षाही हजार ते दीड हजार रुपयांनी कमी विकत आहे..Soybean Procurement: सोयाबीन खरेदीत सरकारकडून दिरंगाई.मागील तीन वर्षांपासून सोयाबीनचे भाव हे निचांकी पातळीवर गेले असून, हमीभावापेक्षा कमी झालेले आहेत. येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता.१७) सोयाबीनला ३६०० ते ४४०० दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनचा हमीभाव ५३५० रुपये आहे. हमीभाव व प्रत्यक्ष दरात मोठी दरी आहे. दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दिवाळीदरम्यान सोयाबीनचे भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती..उत्पादनात घटया वर्षी उत्पादनामध्ये कमालीची घट आली असून एकरी दोन ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन येत आहे. या उत्पादनातून लावलेल्या खर्चाचा ताळमेळही बसत नाही. गोळा बेरीज केली असता सोयाबीनची शेती आतबट्ट्याची ठरल्याचे स्पष्ट दिसते. यापूर्वी एकरी आठ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. परंतु त्या उत्पादनातही शेतकऱ्याच्या हातात जेमतेम मिळकत राहत होती. यंदा तर दोन क्विंटलपासून उत्पादन येत असल्याने बिकट परिस्थिती बनली आहे. त्याचे सावट दिवाळी सणावरही ग्रामीण भागात स्पष्ट दिसते आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.