Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव

Tur Rate : तुरीच्या भावातील तेजी सध्या टिकून आहे. तुरीचा भाव देशातील बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे.

Team Agrowon

Pune News : तुरीच्या भावातील तेजी सध्या टिकून आहे. तुरीचा भाव देशातील बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे. तर जूनपर्यंत तूर बाजारात काही प्रमाणात चढ-उतार राहू शकतात. त्यानंतर सणांच्या काळात दराला आणखी आधार मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचा भाव देशातील बहुतांशी बाजारांमध्ये १० हजारांच्या पुढे आहे. सध्या सरासरी भावपातळी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल म्हणजेच जास्तीत जास्त भाव १२ हजारांच्या दरम्यान आहे. तर बाजारातील तुरीची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. कर्नाटकमधील तुरीची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे डाळीच्या कारखान्यांना मालाचा तुटवडा जाणवत आहे. तर महाराष्ट्रातील आवकही कमी होत आहे.

देशातील बाजाराचा सध्याचा विचार केला तर तुरीचा कमी-अधिक प्रमाणात सरकारच्या नियमात राहून स्टॉक केला जात आहे. प्रक्रिया प्लांट्सचीही खरेदी गरजेप्रमाणे सुरू आहे. तर तुरीच्या डाळीलाही मागणी आहे. पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. त्यामुळे तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. पण पुढच्या दीड ते दोन महिन्यांत तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.

कारण सध्या स्टॉक असलेल्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश जण तुरीची विक्री जूनमध्ये करू शकतात, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. तसेच आयातही सुरूच आहे. यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये दरातील वाढ मर्यादित राहू शकते. सध्याच्या भावात ५०० रुपयांपर्यंतचे चढ-उतार राहू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे जे शेतकरी या काळात तुरीची विक्री करण्याचे नियोजन करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान तूर विक्रीचा विचार करू शकतात, असेही अभ्यासकांनी सांगितले.

तसेच, यंदा पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे. तुरीची लागवड वाढेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला आणि लागवड खरेच वाढली तर याचाही काहीसा परिणाम बाजारावर दिसू शकतो. म्हणजेच तुरीच्या भावातील सुधारणा काही काळ थांबू शकते, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सणांची मागणी राहणार

एकदा तूर विक्रीचा हा टप्पा संपल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे, असेही अभ्यासकांनी सांगितले. कारण तुरीची आयात होणार असली तरी देशात तुरीची टंचाई जास्त आहे. यंदा उत्पादन ३० ते ३२ लाख टनांवरच स्थिरावल्याचे सांगितले जाते. तर देशाला ४६ लाख टनांच्या दरम्यान तूर लागते.

त्यामुळे आयात वाढवली तरी तुरीची टंचाई कायम राहणार आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ च्या वर्षात ७ लाख ७५ हजार टनांची आयात झाली. मागच्या हंगामात ८ लाख ९५ हजार टन आयात झाली होती. तर त्याधीच्या वर्षात ८ लाख ४० हजार टन तूर आयात झाली होती.

आयातही महाग

भारताला यंदा आयात तूरही महाग मिळत आहे. आयात तुरीचा सरासरी भावही ९ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळेच पुढील हंगामातील तूर हाती येईपर्यंत तुरीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सणासुदीच्या काळात तुरीच्या भावाला चांगलाच तडका मिळू शकतो. पण दरात काहीसे चढ- उतारही दिसतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT