Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : बाजारात तूर खातेय भाव

Tur Rate : बाजारात सध्या नव्या तुरीची होणारी आवक जेमतेम आहे. दोन आठवड्यांनंतर त्यात वाढ होण्याची शक्‍यता असली तरी दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे संकेत आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : बाजारात सध्या नव्या तुरीची होणारी आवक जेमतेम आहे. दोन आठवड्यांनंतर त्यात वाढ होण्याची शक्‍यता असली तरी दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे यंदा तूरडाळीचे दरदेखील सुधारण्याचे संकेत आहेत.

यंदाच्या हंगामात सुरुवातील पावसाने खंड दिला. त्यामुळे खरिपातील पिकाची लागवड उशिरा झाली. त्यानंतरच्या काळात काही भागांत संततधार पाऊस तर काही भागांत अतिवृष्टी झाली. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये पाऊस आणि धुके असल्याने त्याचाही फटका तूर पिकाला बसला.

अशाप्रकारे उत्पादकता प्रभावित झाली असताना त्याचा परिणाम कच्चा माल आणि प्रक्रिया केलेल्या डाळीवरही होण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच सध्या तुरीला हमीभावापेक्षा अडीच हजार रुपयांचा अधिक दर मिळत आहे. शासनाने तुरीला सात हजार रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे.

खुल्या बाजारात मात्र तुरीचे व्यवहार ९५०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तुरीचे दर १० हजार रुपयांवर पोहोचण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यंदा शासनाच्या वतीने बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यात येणार असल्याने तुरीच्या दरात घट होण्याची शक्‍यता कमी असल्याचा दावा केला जात आहे.

सध्या बाजारात आवक कमी आहे. नव्या तुरीची काहीअंशी आवक होत असली तरी ती समाधानकारक नाही. दोन आठवड्यात आवक वाढल्यास या दरात काहीअंशी सुधारणा होईल आणि ते किंचित कमी होतील.

परंतु फार कमी होणार नाहीत, असेही सांगितले जात आहे. सध्या शासनाकडून हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. परंतु बाजारात दर जास्त असल्याने या नोंदणीला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

तुरीचे तुलनात्मक बाजारभाव २०२२-२०२३ (रुपयांत)

१० जानेवारी ः ७९०० - ९२९२

११ जानेवारी ः ७८०० - ९१००

१२ जानेवारी ः ८००० - ९२००

१३ जानेवारी ः ८१०० - ९३००

१५ जानेवारी ः ८००० - ९२९१

१७ जानेवारी ः ८१५० - ९५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT