Tur Market : हिंगोली बाजार समितीत तुरीला ८८०० ते ९४३० रुपयांचा दर

Tur Rate : हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. १७) तुरीची १५५ क्विंटल आवक होती.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. १७) तुरीची १५५ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ८८०० ते कमाल ९४३० रुपये तर सरासरी ९११५ रुपये दर मिळाले.

मागील आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या किमान व कमाल दरात किंचित सुधारणा झाली. हिंगोली बाजार समितीत एक दिवसाआड तुरीची आवक होत आहे. शुक्रवारी (ता. १२) तुरीची १३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८३०० ते कमाल ९११० रुपये तर सरासरी ८७०५ रुपये दर मिळाले.

Tur Market
Tur Production : तुरीच्या उत्पादनात मोठी घट

बुधवारी (ता. १०) तुरीची ८१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८८५० रुपये तर सरासरी ८४२५ रुपये दर मिळाले. तुरीची सुगी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अद्याप तुरीची दररोज आवक सुरू झालेली नाही.

Tur Market
Tur Rate : खानदेशात कोरडवाहू तुरीला एकरी दोन क्विंटलपर्यंत उतारा

पाथरी बाजार समितीत शनिवारी (ता. १३) पांढऱ्या तुरीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८७०० रुपये तर सरासरी ८४०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १२) पांढऱ्या तुरीची ५४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८७०१ रुपये तर सरासरी ८६०० रुपये दर मिळाले.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ११) लाल तुरीची १२४ क्विटंल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ९००० रुपये तर सरासरी ८३०० रुपये दर मिळाले. पांढऱ्या तुरीची ६४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८९२१ रुपये तर सरासरी ८७१० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com