Lumpy Control Tips: राज्यात पुन्हा लम्पी रोगाने डोकं वर काढले आहे. काही जिल्ह्यांमध्ये बाधित आणि मृत जनावरांचा आकडा प्रचंड वाढलेला आहे. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी लम्पी पुन्हा फोफावत आहे. त्यामुळे शेतकरी काही नियम, जनावराची काळजी आणि योग्य औषधोपचाराने लम्पीशी लढू शकतात. या लेखासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एस. निटूरे यांनी मार्गदर्शन केले आहे. .पुन्हा लम्पी रोग वाढण्याची कारणे१. दीर्घकाळ पाऊसयंदा राज्यात तुलनेपेक्षा बराच काळ पाऊस झाला. त्यामुळे हे ढगाळ वातावरण लम्पीचा व्हायरस पसरवणाऱ्या परोपजीवींसाठी अतिशय पोषक होते. त्यामुळे परोपजीवी किड्यांवर नियंत्रण मिळवणे मुश्किल झाले आणि त्यांच्यामार्फत गोठ्यामध्ये रोगाची साथ पसरली..Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा.२. देशी गायींकडे केले जाणारे दूर्लक्षलम्पी झालेल्या ९५ टक्के देशी जनावरे आहे. शेतकरी सहसा दुधाळ आणि जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित गायींच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे देशी गायांमध्ये तुलनेने दूर्लक्ष होते. त्यामुळे लम्पी सुरुवातीच्या अवस्थेत ओळखला जात नाही..३. जनावरांची वाहतूक आणि बाजारतीन वर्षापूर्वी लम्पी झालेल्या जनावरांच्या वाहतूकीवर बंदी घातल्यामुळे लम्पी आटोक्यात येण्यास मदत झाली होती. हा संसर्गजन्य आजार असल्याने बाधित जनावरांपासून तो निरोगी जनावरांमध्ये पसरतो. तसेच बरेच लोक लम्पीची प्राथमिक लक्षणे दिसताच जनावरांना विकायला नेतात. त्यामुळे जनावरांचा बाजार हा रोग पसरण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण बनत आहे..४. व्हायसरमध्ये होणारे बदललम्पी रोगाचा व्हायरस हा कालांतराने स्वत:मध्ये बदल करत असतो आणि त्याची रचना बदलते. त्यामुळे बऱ्याचदा एकदा लम्पी होऊन गेलेल्या गायीमध्ये पु्न्हा लम्पी उद्भवण्याची शक्यता असते.५. गाभण गायांमध्ये लसीकरणाचा अभावजुलै महिन्यात आलेल्या लम्पीच्या लाटेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी गाभण गायांना लस दिली नाही. त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आणि वासरांमध्ये लम्पी उद्भवत आहे..६. अंधश्रद्धांवर विश्वासशेतकरी बऱ्याचदा अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात आणि योग्य औषधोपचार करण्याऐवजी घरगुती उपाय करतात. जनावरांमध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती लम्पी रोगाविरुद्ध लढते आणि बहुतेकदा जनावरे ३ ते ४ दिवसात बरी होतात. परंतु या गोष्टीला काही शेतकरी घरगुती उपायाला जोडतात आणि अंधश्रद्धा पसरवतात. या अंधश्रद्धांमुळे जनावर बरे होत नसून ते केवळ त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आणि औषधोपचाराने बरे होत असते..लम्पीसाठी उपाययोजना१. विलगीकरणलम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने बाधित जनावराला निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे. शक्यतो दुसऱ्या गोठ्यात ठेवावे. त्याची काळजी घेणारा आणि निरोगी जनावरांची काळजी घेणारे व्यक्ती वेगवेगळे असावे. एकच व्यक्ती असल्यास बाधित जनावरांच्या गोठ्यातून बाहेर आल्या आल्या स्वच्छ हातपाय धुवावेत..२. गोठ्याची स्वच्छतालम्पी हा गोमाशी, गोचीड, डास यांच्यामुळे पसरतो. ढगाळ वातावरण त्यांच्यासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे गोठा कायम स्वच्छ ठेवावा. कीटकनाशकांची फवारणी करावी. गोठ्यामधअये किंवा आजूबाजूला पाणी साठू देऊ नये..Animal Care : गोठ्यातील गोचीड, माशा, उवा, पिसवा पळवून लावण्याचे उपाय.३. जनावरांच्या वाहतुकीला बंदीलम्पीची लाट आल्यावर शक्यतो जनावरांची वाहतूक टाळावी. जनावरांना बाजारात नेणे टाळावे तसेच नवीन जनावरांची खरेदीसुद्धा टाळावी.४. योग्य औषधोपचारलम्पीची लक्षणे दिसल्यावर लवकरात लवकर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावे आणि पशुवैद्यांनी आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दिलेली औषधे पूर्ण द्यावीत..५. आहाराची काळजीलम्पी हा औषधोपचाराने २० टक्के तर काळजी आणि व्यवस्थापनामुळे ८० टक्के बरा होतो. त्यामुळे औषधे दिली तर जनावरांच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अशावेळी जनावरांना ऊर्जायुक्त, सकस आहार द्यावा. त्यामुळे पशुआहारात २/३ भाग वैरण असावी, तर १/३ भाग पशुखाद्य असावे. तसेच जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण (दररोज ५० ग्रॅम) देणे गरजेचे आहे..६. लसीकरणलम्पीच्या प्रसारामध्ये लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे निरोगी जनावरांना ताबडतोब लसीकरण करुन घ्यावे. लम्पी व्हायरस हा गोट पॉक्स व्हायसरच्या फॅमिलीतील असल्याने सध्या गोट पॉक्सची लस त्याला दिली जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.