Agriculture Commodity Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : हरभरा, मूग, तुरीच्या किमतीत उतरता कल

Cotton Rate : अमेरिकेतील कापसाचे भाव ३ टक्क्यांनी घसरले, तर सोयाबीनचे भाव ०.६७ टक्क्याने वाढले. खरीप पिकासाठी पुढील वर्षासाठीचे हमीभाव मे महिनाअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १० ते १६ मे २०२५

या सप्ताहात कापूस, मका, हरभरा, तूर व कांदा यांचे भाव घसरले; इतर पिकांचे भाव वाढले. कांद्याचे भाव रु. १,११० वर आले आहेत, तर टोमॅटो रु. १,१६७ पर्यंत गेला आहे. अमेरिकेतील कापसाचे भाव ३ टक्क्यांनी घसरले, तर सोयाबीनचे भाव ०.६७ टक्क्याने वाढले. खरीप पिकासाठी पुढील वर्षासाठीचे हमीभाव मे महिनाअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांत कापूस, मका यांच्या किमती वाढत आहेत. हरभरा, मूग व तूर यांच्या किमती उतरता कल दाखवत आहेत.

१६ मे २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेतः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून रु. ५४,३८० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ५५,१४० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५७,५०६ वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरले.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,४८५ वर आले होते. या सप्ताहात ते रु. १,४८५ वरच स्थिर आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स ३.८ टक्क्यांनी वाढून रु. १,५३८ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८८ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२४० वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,२५४ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,२६६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्याने अधिक आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने घसरून रु. १४,३३७ वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या १.९ टक्क्याने वाढून रु. १४,६०२ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती ७.४ टक्क्यांनी वाढून रु. १४,६३४ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १४,७५८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.१ टक्क्याने अधिक आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भावसुद्धा २.१ टक्क्यांनी वाढून रु. १५,८७६ वर आला आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,०५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्याने घसरून रु. ५,९७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,७२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्क्याने वाढून रु. ४,४९५ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.६७ टक्क्याने वाढले.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,३८४ वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. ७,२८० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) या सप्ताहात २.४ टक्क्यांनी घसरून रु. १,११० वर आली आहे. कांद्याची आवक वाढत आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,१६७ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT