Soybean Storage : लातूरमध्ये लवकरच सोयाबीन साठवणूक क्लस्टर

Soybean Cluster : नाफेडमार्फत राबविण्यात येत असलेल्या हमीभाव अर्थात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Latur News : नाफेडमार्फत राबविण्यात येत असलेल्या हमीभाव अर्थात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून खरेदी केलेल्या सोयाबीन साठवणुकीचे नियोजन अतिशय सुयोग्य व गतिमानतेने करण्यात आले.

साठवणुकीसाठी महामंडाळाकडून स्वमालकीच्या गोदामात तसेच दुप्पट क्षमतेने भाड्याची गोदामे घेऊन नियोजन करण्यात आले होते. सोयाबीन उत्पादन लक्षात घेता आता लातूरला वखार महामंडळाचे सोयाबीन साठवणूक क्लस्टर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. या क्लस्टरमध्येच लातूरला सायलो पद्धतीने तसेच आधुनिक साठवणूक प्रकल्प येथे उभारला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या महामंडळाच्या लातूर विभागातील पारंपरिक गोदाम क्षमतेवर मर्यादा आहेत. आधुनिक साठवण सुविधा क्षमतेत वाढ होणे गरजेचे आहे. सदर बाबींचा सखोल आढावा घेत व शेतकरी हिताच्या दृष्टीने श्री. दिवेगावकर यांनी महामंडळाच्या वतीने विविध ठिकाणी सायलो व आधुनिक साठवण प्रकल्पांचे नियोजन करून उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

येथील एमआयडीसी परिसरात नवीन सायलो प्रकल्प व अत्याधुनिक गोदामांची उभारणी होणार आहे. लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर असल्याने सोयाबीनची मूल्यसाखळी निर्माण करण्यासाठी व लातूर येथे साठवणूक क्षमतेतील कमतरता लक्षात घेऊन दहा हजार टन क्षमतेच्या सायलो उभारणीचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येत आहे.

Soybean
Soybean Crop Loan : सोयाबीनला हेक्टरी ७५ हजारांचे पीक कर्ज

या प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. सायलो बांधकामाची निविदा काढण्यात आली आहे. तसेच दहा हजार टन क्षमतेचे आधुनिक साठवणूक सुविधेने सज्ज अशा गोदामाची उभारणी देखील करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी वखार महामंडळास राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार असल्याचे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले.

Soybean
Soybean Price Rise: व्यापार युद्ध निवळल्याने सोयाबीनच्या दरात वाढ

पानगावला तीन हजार टन क्षमतेचे गोदाम

यासोबतच पानगाव (ता. रेणापूर) येथे वखार महामंडळाला कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिली आहे. येथे तीन हजार टन क्षमतेचे गोदाम उभारणी करून नवीन वखार केंद्र सुरू करण्यात येत आहे. कामकाजाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चापोली येथे आधुनिक सुविधा असलेले नवीन गोदाम तयार करण्यात येत आहे. याची साठवण क्षमता बाराशे टन इतकी आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच गोदाम बांधकामास सुरुवात होणार असल्याचे दिवेगावकर यांनी सांगितले.

लातूर सोयाबीनचे हब आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन येथे घेतले जाते. त्या तुलनेत वखार महामंडळाकडे साठवण क्षमता कमी होती. यातून आता लातूर जिल्ह्यात 'सोयाबीन साठवण क्लस्टर' विकसित केले जात आहे. यात सायलो अन् आधुनिक साठवणूक गोदाम उभे केले जाणार आहेत. या वर्षी तूर आणि हरभऱ्याला बाजार भाव चांगला राहिल्याने त्याची अद्याप शासकीय खरेदी सुरू झाली नाही. अन्यथा साठवणीला अडचणी आल्या असत्या. भविष्यात या अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. येत्या काही महिन्यांमध्ये हे प्रकल्प प्रत्यक्ष अंमलात येतील. लातूर जिल्हा राज्यातील एक मॉडेल अन्नधान्य साठवण हब म्हणून उभा राहील.
-कौस्तुभ दिवेगावकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, वखार महामंडळ, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com