Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : बीड जिल्ह्यात हमीभावाने ५.९४ लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी

Soybean Market : या केंद्रांवरून विहित मुदतीत २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ५ लाख ९४ हजार २०१ क्विंटल १३ किलो सोयाबीनची ४८९२ प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.

Team Agrowon

Beed News : जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी ३० केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून विहित मुदतीत २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ५ लाख ९४ हजार २०१ क्विंटल १३ किलो सोयाबीनची ४८९२ प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.

माहितीनुसार, सुरुवातीला आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी दरम्यान विहित मुदत होती त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत पहिल्यांदा व सहा फेब्रुवारीपर्यंत दुसऱ्यांदा आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

बीड जिल्ह्यात आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी दोन ऑक्टोबर ते १३ डिसेंबर दरम्यान सुमारे ३० खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या खरेदी केंद्रांवरून सुमारे ४४,७४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

मार्केटिंग फेडरेशनच्या यंत्रणेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी विहित मुदतीत प्रत्यक्ष खरेदी करता येण्याचे एसएमएस केवळ ३९ हजार ३१२ शेतकऱ्यांना पाठविण्यात आले.

एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडील ५ लाख ९४ हजार २०१ क्विंटल १३ किलो सोयाबीनचीच ४८९२ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणे मार्केटिंग फेडरेशनला शक्य झाले.

म्हणजे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा विचार करता त्यापैकी २३ हजार ७७५ शेतकऱ्यांकडील तर एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांचा विचार करता सुमारे १८ हजार ३४३ शेतकऱ्यांकडे सोयाबीन खरेदी करणे मार्केटिंग फेडरेशनच्या यंत्रणेला शक्य झाली नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे आधीच दबावात असलेले दर लक्षात घेता आधारभूत किमती पेक्षाही कमी दराने सोयाबीन विकण्याशिवाय या शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याचे चित्र आहे.

७६४४ शेतकऱ्यांकडून चुकारे अदा

वाढीव मुदतीअंती म्हणजे ७ फेब्रुवारीपर्यंत आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ७६४४ शेतकऱ्यांच्या १ लाख ६५ हजार २४३ क्विंटल २८ किलो सोयाबीनचे चुकारे अदा करण्यात आले होते.

दुसरीकडे सात फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या एकूण सोयाबीनपैकी १ लाख ७३ हजार ७८० क्विंटल ३६ किलो सोयाबीन गोडाऊनमध्ये साठविण्यात आले होते.

'तर सुमारे ४ लाख २० हजार ४२० क्विंटल ७७ किलो सोयाबीन गोडाऊनमध्ये साठविणे बाकी होते.घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT