Soybean MSP : सोयाबीनसाठी ७०७७, तर कापसाकरिता १०५७९ रुपये हमीभावाची शिफारस

Cotton MSP : हमीभावाकरिता देशभरात चार झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. यातील पश्‍चिम झोन असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व अन्य अशा चार राज्यांच्या कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशी संदर्भातील बैठक मंगळवारी (ता. ४) दिल्लीत पार पडली.
Cotton and Soybean
Cotton and SoybeanAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर दिला जाईल, अशा हालचाली सुरू होत्या. त्यानंतर मात्र या संदर्भाने निर्णय झाला नसला, तरी आता खरीप हंगाम २०२५-२६ करिता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला ७०७७ रुपये हमीभाव मिळावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा दर रेटण्यात आला.

हमीभावाकरिता देशभरात चार झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. यातील पश्‍चिम झोन असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व अन्य अशा चार राज्यांच्या कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशी संदर्भातील बैठक मंगळवारी (ता. ४) दिल्लीत पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षांसह महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी प्रतिनिधी रवींद्र मेटकर (अमरावती) यांच्यासह त्या त्या राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Cotton and Soybean
Cotton Bag Corruption: कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत ४१ कोटींचा भ्रष्टाचार

महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाकडून या वेळी सोयाबीनसाठी ७०७७ रुपयांच्या हमीभावाची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या हंगामात ४८९२ रुपयांचा हमीभाव सोयाबीनला होता.

त्यामुळे यंदाच्या हंगामात २१८५ रुपयांच्या वाढीची शिफारस राज्याकडून करण्यात आली आहे, असे असले तरी मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनला दहा हजार रुपयांचा हमीभाव मिळावा याकरिता आंदोलनाचे हत्यार उपसले होते. याची दखल घेत सरकारला यंदा सोयाबीन हमीभावाबाबत मध्य काढावा लागणार आहे.

Cotton and Soybean
Soybean Protest : कृषिमंत्र्यांच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार; किसान सभेचे नेते अजित नवलेंचा इशारा

कापसाला १०५७९ रुपयांची शिफारस

राज्यातील मुख्य पीक असलेल्या कापसाकरिता यंदाच्या हंगामात १०५७९ रुपयांची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या हंगामात लांब धाग्याच्या कापूस वाणासाठी ७५२१ रुपये इतका हमीभाव होता. यंदा त्यात ३०५८ रुपये इतक्‍या वाढीची शिफारस राज्य कृषिमूल्य आयोगाकडून करण्यात आली आहे.

...अशी आहे शिफारस. तर चौकटीत गेल्या हंगामातील दर (रुपयांत)

धान ः ४७८३ (२३००)

ज्वार ः ४७८८ (३३७१)

ः २९३९ (२२२५)

तूर ः ८३१५ (७५५०)

ंग ः १२१४६ (८६८२)

उडीद ः ११७५३ (७४००)

भुईमूग ः ११८१७ (६७८३)

तीळ ः ११४२२ (९२६७)

कृषिमूल्य आयोगाच्या दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत सोयाबीन व कपासाच्या हमीभाव वाढीची शिफारस महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे. ३०५८ रुपये कापसात, तर २१८५ रुपये सोयाबीनमध्ये वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. उर्वरित झोनच्या बैठका पार पडल्यानंतर केंद्र सरकारस्तरावर हमीभावाची घोषणा केली जाते.
- रवींद्र मेटकर, शेतकरी प्रतिनिधी, कृषिमूल्य आयोग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com