Moong Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Moong Market : खानदेशात मुगाला साडेआठ हजारांवर दर

Moong Market rate : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत मुगाची आवक सुरू झाली आहे. कमाल दर आठ हजार ६५१ रुपयांपर्यंत मिळत आहे. आवक सध्या रखडत किंवा कमी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत मुगाची आवक सुरू झाली आहे. कमाल दर आठ हजार ६५१ रुपयांपर्यंत मिळत आहे. आवक सध्या रखडत किंवा कमी आहे.

चाळीसगाव (जि. जळगाव) बाजार समितीमध्ये शेतकरी प्रवीण पाटील (माळशेवगे, ता. चाळीसगाव) यांनी चालू हंगामातील विक्रीसाठी आणलेल्या मुगाला प्रतिक्विंटल ८ हजार ६५१ रुपये विक्रमी भाव मिळाला. शेतकरी धनराज हरी चव्हाण (वलठाण, ता. चाळीसगाव) यांच्या मुगास ८ हजार १८१ प्रतिक्विंटल दर मिळाला.

चाळीसगाव बाजार समिती ही उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य बाजार समिती आहे. धुळे, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या तीन्ही जिल्ह्यांमधून बाजारात शेतीमाल येतो. खिल्लारी बैलांसह भुसार मालासाठी ही बाजार समिती प्रसिद्ध आहे. यासोबत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर या बाजार समित्यांतही काही शेतकऱ्यांकडून मागील दोन-तीन दिवसांत मुगाची पाठवणूक झाली आहे. तेथेही साडेआठ हजारांवर कमाल दर मुगास मिळाला आहे.

यंदा मुगाची पेरणी अल्प किंवा कमी आहे. यामुळे आवक कमी किंवा रखडत सुरू आहे. अनेक शेतकरी आपापल्या गावातच मुगाची विक्री करीत आहेत. उत्पादन कमी आहे. त्यात पाऊसही हवा तसा नव्हता. कीड रोगांमुळेही उत्पादकतेवर यंदा परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या खानदेशात रोज ६० ते ६५ क्विंटल एवढ्या मुगाची शिरपूर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या बाजार समित्यांत आवक होत आहे. आवक यंदा कमीच राहील, असाही अंदाज आहे.

मागील वर्षी मुगाचे पीक बऱ्यापैकी होते. परंतु अतिपावसात नुकसान झाले. काही भागांतच उत्पादन व्यवस्थितपणे हाती आले. मागील हंगामातील दरही आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. किमान दर सहा हजार रुपये होते. यंदा अतिपाऊस नाही. परंतु जूनमध्ये पाऊस नव्हता. यामुळे पेरणी उशिरा झाली.

६ जुलैपासून पाऊस सुरू झाला. यात पेरणीची मुदत संपल्याने मुगाची पेरणी होऊ शकली नाही. काही शेतकऱ्यांनी कृत्रिम जलसाठ्यांच्या आधारावर पेरणी केली होती. परंतु पेरणी सर्वत्र होऊ शकली नाही, अशी माहिती शेतकरी तसेच कृषी विभागाकडून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT