Moong Urad Sowing : मराठवाड्यात ज्वारी, मूग, उडदाची अपेक्षित पेरणी नाहीच

Kharif Sowing : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीच्या शिफारशीचा कालावधी उलटून गेला असतानाही खरीप ज्वारी, मूग व उडदाची अपेक्षित क्षेत्रावर पेरणी झालीच नसल्याची स्थिती आहे.
Jowar Sowing
Jowar SowingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati SambhajiNagar News : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीच्या शिफारशीचा कालावधी उलटून गेला असतानाही खरीप ज्वारी, मूग व उडदाची अपेक्षित क्षेत्रावर पेरणी झालीच नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ८० टक्केच पेरणी झाली असल्याने उर्वरित क्षेत्रावर आपत्कालीन पीक नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मुग व उडदाची पेरणी करण्याचा कालावधी ७ ते १० जुलै आहे. दुसरीकडे १५ जुलैपर्यंत खरीप ज्वारीची पेरणी करण्याची विद्यापीठाकडून शिफारस आहे.

प्रत्यक्षात हे दोन्ही कालावधी उलटून गेल्याने आता या पिकाच्या उरलेल्या सर्वसाधारण क्षेत्रावर आपत्कालीन पीक नियोजन करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६४ हजार १३५. ५३ हेक्टर इतके आहे.

Jowar Sowing
Kharif Sowing : मोहोळ तालुक्यात केवळ वीस टक्केच पेरण्या

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यातील ६७ हजार २९६ हेक्टर तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २८ हजार ११४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ५८ हजार ४९४ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३५.६४ टक्के क्षेत्रावरच मुगाची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या मुगाच्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यातील ३० हजार ३८० हेक्टर तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यातील २८ हजार ११४ हेक्टर मूग क्षेत्राचा समावेश आहे.

Jowar Sowing
Kharif Sowing : रावेर तालुक्यात ८० टक्के पेरण्या

उडीदाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४६ हजार ७७६ हेक्‍टर आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड या तीन जिल्ह्यातील ४७ हजार ८४९ हेक्टर तर लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील ९८ हजार ९२७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ६२ हजार ८१८ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या केवळ ४२.८० टक्के क्षेत्रावरच उडदाची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या क्षेत्रात लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील २७ हजार ९४३ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यातील ३४ हजार ८७५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६ हजार ६०४ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १७ हजार ६६७ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १६.५७ टक्के क्षेत्रावरच खरीप ज्वारीची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com