Moong Sowing : पश्चिम विदर्भात मूग, उडदाचे क्षेत्र खालावले

Urad Sowing : या विभागात जुलैत झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरण्यांना वेग आला. आता संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आले आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on

Akola News : या विभागात जुलैत झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरण्यांना वेग आला. आता संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी पीक खरडून गेल्याने या क्षेत्रावर पुन्हा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

खरीप हंगामात यंदा पेरण्यांना पावसाअभावी सुरवातीला विलंब झाला होता. जुलैत पाऊस झाल्यानंतर पेरण्या सुरु झाल्या होत्या.

सध्या पीक परिस्थिती समाधानकारक आहे. सोयाबीनचे पीक जोमाने वाढते आहे. तर जूनमध्ये लागवड केलेले कपाशीचे पीक फूल पात्याच्या अवस्थेत येत आहे. लांबलेल्या पेरण्यामुळे यावर्षी मूग, उडदाच्या लागवडीला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मुगाचे क्षेत्र २० हजार ४०६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा केवळ ७ हजार १२० हेक्टर (३५ टक्के) लागवड झाली. उडदाचीही २२ हजार ६९७ च्या तुलनेत ७००३ (३१ टक्के) लागवड झाली.

Kharif Season
Moong Urad Sowing : मूग, उडदाच्या लागवडीला फटका

अकोल्यात मुगाची १७६१५ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अवघी ३२७३ हेक्टर (१९ टक्के) तर उडीद पिकाचीही १९ टक्के म्हणजेच ११ हजार ४६० च्या तुलनेत २ हजार १४८ हेक्टरवर पेरणी झाली.

वाशीम जिल्हयात मूग व उडदाची सर्वात कमी लागवड आहे. या जिल्ह्यात मुगाचे ७ हजार ८९७ हेक्टर सरासरी क्षेत्र असून तेथे ५३४ हेक्टर (७ टक्के) पेरणी झाली. तर उडीद पिकाची १० हजार ४९१ च्या तुलनेत ६३७ हेक्टर (६ टक्के) वर पेरणी झाली.

सोयाबीन, तुरीची संपूर्ण क्षेत्रावर पेरणी या तीनही जिल्हयात सोयाबीनची मात्र सरासरी इतकी किंवा त्याहीपेक्षा जास्त लागवड झाली. बुलडाण्यात सुमारे ३ लाख ९५ हजार ४३० हेक्टर, अकोल्यात सरासरीच्या १०९ टक्के म्हणजेच २१७७०४ हेक्टर आणि वाशीम जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ९९५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली. सोयाबीन पिकात बहुतांश शेतकरी तुरीचे आंतरपीक लावतात.

Kharif Season
Moong Urad Sowing : मराठवाड्यात ज्वारी, मूग, उडदाची अपेक्षित पेरणी नाहीच

यंदाच्या हंगामात पेरणीला उशीर होऊनही तुरीची लागवड उद्दिष्टापर्यंत पोचली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ७६ हजार ३७५ (९६ टक्के) हेक्टरवर लागवड झाली. अकोल्यात ५३ हजार १६१ (९६ टक्के) हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ६२ हजार १३१ (१०६ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली. गेल्या काळात झालेल्या सततच्या पावसामुळे तुरीचे पीक काही ठिकाणी जळत असल्याचे समोर आले आहे.

कपाशीची लागवड अकोल्यात कमी, वाशीममध्ये वाढली खरिपातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीची लागवड यावर्षी वाशीम जिल्हयात वाढली आहे. वास्तविक वाशीम जिल्हा हा सोयाबीन पिकाचे आगार समजले जाते. या जिल्ह्यात कपाशीची यंदा २२ हजार ३१८ हेक्टरवर लागवड झाली. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १८ हजार ०१४ हेक्टर असून तुलनेने १२४ टक्के ही लागवड आहे.

जिल्हानिहाय लागवड

अकोला ४०१५८५ (९१ टक्के) हेक्टर

बुलडाणा ६८८९७३ (९४ टक्के)

वाशीम ३८६३०९ (९५ टक्के)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com