Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांचे दर २०० ते ३०० रुपयांवर

Betel Leaf Market: पाऊस पडताच खाऊच्या पानांची उत्पादकता सुरू होते. त्यानंतरच्या काळात गणपतीसह इतर सण-उत्सवांमध्ये मागणी देखील वाढती असल्याने दरही तेजीत राहतात, अशी माहिती विडूळ येथील पान उत्पादक गजानन बिचेवार यांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News: पाऊस पडताच खाऊच्या पानांची उत्पादकता सुरू होते. त्यानंतरच्या काळात गणपतीसह इतर सण-उत्सवांमध्ये मागणी देखील वाढती असल्याने दरही तेजीत राहतात, अशी माहिती विडूळ येथील पान उत्पादक गजानन बिचेवार यांनी दिली.

उमरखेड तालुक्‍यातील विडूळ हे गाव प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांनी खाऊच्या पानांसह हळद, ज्वारी, रेशीम यांसारख्या व्यावसायिक पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. खाऊच्या पानांच्या उत्पादनात या गावातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्य राखले आहे. त्यामुळेच हे गाव विदर्भासह राज्यातही प्रसिद्ध आहे.

राज्याच्या इतर भागात पानमळ्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले असताना या गावाने मात्र या पिकातील ओळख कायम ठेवली आहे. गजानन बिचेवार देखील खाऊच्या पानांचे उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून घेतात. या वर्षी त्यांची सुमारे सव्वा एकरावर लागवड आहे. त्यांच्या या क्षेत्रातून एका आठवड्याला एक लाखांवर पानाचे उत्पादन आणि तोड होते. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मिळून ३० ते ३५ पानमळे गावशिवारात आहेत.

या माध्यमातून विडूळ परिसरात ५५ एकरांवर लागवड आहे. उमरखेड, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस या भागांत पानाची विक्री होते. पूर्वी विडूळमधील शेतकऱ्यांना पानांच्या विक्रीसाठी उमरखेडचा एकमेव पर्याय होता. आता अडत्यांद्वारे बुधवार आणि शनिवार असे दोन दिवस विडूळ गावातच लिलाव होतात, असेही श्री. बिचेवार यांनी सांगितले.

सध्या खाऊच्या पानांचा हंगाम नाही, त्यासोबतच खाऊच्या पानाला मागणी देखील राहत नाही. परिणामी बाजारात २०० ते ३०० रुपयांना १००० पाने याप्रमाणे पानाचे दर आहेत. कपुरी पानाचे उत्पादन या भागात होते. १५ ते २० दिवसांत नव्या हंगामास सुरुवात होत या भागातील पानांची आवक बाजारात होण्यास सुरुवात होईल, असेही बिचेवार यांनी सांगितले.

सध्या बाजारात होणारी खाऊच्या पानांची आवक ही कर्नाटकातील आहे. पाऊस पडल्याने आता या भागातील पाने देखील बाजारात येणार आहेत. त्यामुळे प्रती एक हजार खाऊच्या पानांसाठी ५०० रुपयांपर्यंतचा दर मिळतो.
गजानन बिचेवार, कपुरी पान उत्पादक शेतकरी, विडूळ, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Agriculture Commissioner Suraj Mandhare : धोरणात्मक बदलामुळे गुणनियंत्रण होणार प्रभावी

Wildlife Conflict: वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मान फासात

Environmental Management: इरिओफाइड कोळीचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Mission Jalbandhu: रोजगार, जलसुरक्षितेसाठी ‘मिशन जलबंधू’

SCROLL FOR NEXT