Parbhani News: रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४ लाख ९९ हजार २४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी ९३ हजार ८५६ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली असून, अद्याप ४ लाख ५ हजार ३९३ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी गुरुवार (ता. १५)पर्यंतची अंतिम मुदत आहे..परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये २ लाख ९३ हजार ८६१ हेक्टरवर पेरणी झाली. बुधवार (ता. १४) पर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ७९ हजार ९९२ पैकी ६८ हजार १६२ प्लॉटची पीक पाहणीसाठी नोंदणी झाली असून, ६७ हजार ८२१ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली आहे. रब्बी पेरणीपैकी २ लाख २६ हजार ४० हेक्टर क्षेत्राची ई- पीक पाहणी बाकी.E Crop Survey: रब्बीतील ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी.हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२५ मध्ये २ लाख ५ हजार ३८८ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यातील ४ लाख ६८ हाजर ७८० पैकी २७ हजार १९८ प्लॉटची पीक पाहणीसाठी नोंदणी झाली असून, २६ हजार ३५ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली आहे. रब्बी पेरणी पैकी १ लाख ७९ हजार ३५३ हेक्टर क्षेत्राची ई- पीक पाहणी बाकी आहे..E Crop Survey: ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाइन पाहणी.पंतप्रधान पीकविमा योजना तसेच पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वेळेत व योग्यरीत्या मिळावी यासाठी ई-पीक पाहणी ही आवश्यक अट म्हणून विहित करण्यात आली आहे. .त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची खातरजमा करण्याच्या दृष्टीने ई-पीक पाहणी करणे अनिवार्य असून, ई-पीक पाहणी करण्याची सुधारित अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.