Betel Leaf Harvesting : पावसामुळे खाऊच्या पानांचा खुडा थांबला

Betel Leaf Production : गेल्या वीस दिवसांपूर्वी अति उष्णता, गेल्या आठवड्यापासून पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका पानमळ्यांना बसला आहे. परिमाणी अपेक्षित फुटवा न मिळाल्याने उत्पादनही कमी आहे. पानांच्या बाजारपेठेत मागणी आहे.
Betel Leaf Farming
Betel Leaf Farming Agrowon
Published on
Updated on

Sangli News : गेल्या वीस दिवसांपूर्वी अति उष्णता, गेल्या आठवड्यापासून पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका पानमळ्यांना बसला आहे. परिमाणी अपेक्षित फुटवा न मिळाल्याने उत्पादनही कमी आहे. पानांच्या बाजारपेठेत मागणी आहे.

परंतु पावसामुळे पानांचा खुडा थांबवला आहे. सद्यःस्थितीला पानांना प्रति डागाला (एका डागात १२ हजार पाने) १००० रुपयांपासून पाच हजारांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून पानांच्या दरात किंचित वाढ झाली असल्याचे पान उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा अतिउष्णतेचा फटका पानमळ्यांना बसल्याने अपेक्षित फुटवा मिळाला नाही. पानांचा आकारही वाढला नाही. या साऱ्यामुळे शेतकरी संकटात असतानाच मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पानांचा खुडा करणे थांबवले आहे. ढगाळ वातावणामुळे वेलींना मिळणारा फुटवाही थांबला आहे. बाजारपेठेत मागणी आहे. परंतु पानांचा खुडा थांबल्याने विक्री करणे कठीण बनले आहे.

Betel Leaf Farming
Betel Leaf Farming : पानवेलींच्या शेतीत जडलाय जीव

गेल्या महिन्यात पानांच्या बाजारपेठेत चेन्नईतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णूर या भागातील पाने विक्रीला आली होती. या दरम्यान, जिल्ह्यातील पानमळ्यांची खुडणी केल्याने वेलीवर पानांची संख्या कमी राहते. यामुळे कमीअधिक प्रमाणात पानांची विक्री सुरू होती.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पानांचा खुडा सुरू केला असून विक्री सुरू केली आहे. चेन्नईतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णूर या भागातील पानांची आवक काहीशी मंदावली आहे. पानांच्या पेठेत जिल्ह्यातील खाऊच्या पानांची मागणी वाढली आहे.

परंतु बदतले वातावरण आणि मॉन्सूनपूर्व पावसामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षित फुटवा नसल्याने आणि शेतात पाणी साचल्याने खुडा थांबला आहे. त्यामुळे बाजापेठेत मागणी असूनही पानांचा पुरवठा करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे काय करावे असा प्रश्न पान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

Betel Leaf Farming
Betel Leaf Farming: उन्हाचा फटक्यामुळे खाऊच्या पानांची वाढ खुंटली

मागणीमुळे दरात किंचित वाढ

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पानांच्या पेठामध्ये इतर भागातील पानांची आवक चांगली होती. त्यामुळे दर कमी अधिक प्रमाणात होते. सद्यःस्थितीला पानांची मागणी आहे, परंतु पुरवठा कमी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पानांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. दर वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पानांचे दर-एका डागात (१२ हजार पाने)

कळी ः २५०० ते ५०००

हक्कल ः १००० ते १२००

ढगाळ वातावरण असल्याने फुटवा कमी आहे. त्यामुळे उत्पादन कमी मिळत आहे. खुडा थांबला आहे.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, ता. मिरज
यंदाच्या हंगामात पानांचे दर बरे आहेत. परंतु पावसाच्या पाण्यामुळे मूळकुज होण्याची भीती आहे.
- प्रभाकर नागरगोजे, पान उत्पादन शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com