Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सहा हजार रुपयांनी सोयाबीनची शासनालाच करावी लागेल खरेदी

Soybean MSP : पंतप्रधान मोदी यांनी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्‍विंटल देण्यात येईल, अशी घोषणा केल्याचे वृत्त आहे.

Team Agrowon

Nagpur News : पंतप्रधान मोदी यांनी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्‍विंटल देण्यात येईल, अशी घोषणा केल्याचे वृत्त आहे. सोयाबीन उत्पादकांसाठी हा दिलासादायक निर्णय असला, तरी खुल्या बाजारात हा दर मिळणे अशक्‍य असल्याने वाढीव दराचा बोजा सहन करीत उत्पादित सर्वच सोयाबीनची खरेदी शासनाला करावी लागेल, असे बाजार विश्‍लेषकांनी सांगितले.

मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सोयाबीन लागवड आणि उत्पादकतेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कमी दराने विकल्या जाणाऱ्या सोयाबीनचा मुद्दा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर असल्याचे चित्र आहे. विरोधातील काँग्रेसने सोयाबीनला सात हजार रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देणार असल्याचे थेट जाहीर केले.

विशेष म्हणजे यापूर्वी सत्ताधारी महायुतीकडून सोयाबीन उत्पादकांना भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्‍टरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दहा डॉलर प्रति बुशेल (तीन हजार रुपये क्‍विंटल), तर सोया पेंडचा दर २८ रुपये प्रति किलो (२८०० रुपये क्‍विंटल) आहे.

अशातच भारतीय शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर कसा मिळेल, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. प्रक्रिया उद्योजकांकडे आधीच महागडी सोया पेंड पडून आहे. त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हा दर मिळणे अशक्‍यच आहे. परिणामी, सरकारलाच सहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी करावी लागणार असल्याचे सांगितले जाते. देशाचे एकूण सोयाबीन उत्पादन १२५ लाख टन इतके आहे.

जागतिक व्यापार महासंघाच्या निकषानुसार निर्यातीला अनुदान देता येत नाही. परंतु यापूर्वी कारखाना ते बंदरापर्यंतच्या वाहतुकीवर अनुदान देण्याचे धोरण साखरेकरिता होते. त्याचप्रमाणे वाहतूक अनुदान व इतर उपाय करून हा वाढीव दर देता येणे शक्‍य आहे.
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग
जागतिक बाजारात सोयाबीन तीन हजार रुपये क्‍विंटल आहे. सोया पेंड २८०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावली आहे. त्यामुळे सहा हजार रुपयांचा दर द्यायचा असेल, तर सरकारलाच संपूर्ण सोयाबीनची खरेदी करावी लागेल. त्यानंतर प्रक्रिया उद्योगाला सवलतीच्या दरात त्याचा पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही.
- विजय जावंधिया, शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT