Soybean Market : पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Soybean Arrival : पुसद बाजार समितीत सोयाबीनची दररोज सरासरी ७५५ पोते एवढी आवक होत असून ३९०० ते ४ हजार २७५ रुपये एवढा दर मिळाला आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : पुसद बाजार समितीत सोयाबीनची दररोज सरासरी ७५५ पोते एवढी आवक होत असून ३९०० ते ४ हजार २७५ रुपये एवढा दर मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यापासून आजपर्यंत बाजार समितीत केवळ २४ हजार क्विंटलची आवक झाली असून, दरवर्षीच्या तुलनेत ही आवक अत्यल्प असल्याचे सांगण्यात आले.

एकेकाळी यवतमाळ जिल्ह्यात नावलौकिक असलेली पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती सेस कमावण्यात आघाडीवर होती. परंतु मागील दोन, तीन दशकांपासून शेतमालाच्या आवकेत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात ही घट होत आहे. बाजार समितीत शेतकरीपूरक सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्याचाही परिणाम आवके वर झाला आहे.

Soybean Market
Soybean Market : आर्द्रतेचा हमीभावाने सोयाबीन खरेदीत खोडा

अनेक वेळा व्यापाऱ्याचा माल शेडमध्ये तर शेतकऱ्याचा माल उघड्यावर लिलावासाठी ठेवला जातो. ग्रामीण भागातील भुसार मालाची खरेदी होत असलेल्या ज्यामध्ये गहू, ज्वारी, तूर व हरभरा या शेतीमालाचा समावेश आहे. त्या बाजार समितीत शेतमाल ठेवण्यासाठी केवळ दोन शेड असून बहुतांशवेळी हे दोन्ही शेड व्यापाऱ्यांच्या मालाने भरलेले असतात.

परिणामी शेतकऱ्यांचा शेतीमाल शेडमधील उर्वरित जागेत किंवा आवक वाढल्यास रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेतील ओट्यावर लिलावासाठी उतरवला जातो. यात शेतकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस आदी बाबींना तोंड द्यावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी लावलेले वाटर फिल्टर बंद असते. तर पाणी पिण्यासाठी ठेवलेले माठ ही रिकामेच राहतात. शौचालयाची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांना जेवण करण्यासाठी स्वच्छ जागा नाही.

Soybean Market
Soybean Market : एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आर्द्रता बारा टक्के असावी

अनेक वेळा लिलाव उशिरा चालू होत असल्याने काट्याला सायंकाळ होते. यामुळे शेतकऱ्यांना खेड्यावर जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अनेक वेळा बाजार समितीत मोकाट जनावरेसुद्धा फिरताना आढळून येतात. ठोक माल असलेले सोयाबीन व भुईमुगाची खरेदी टी.एम.सी. यार्ड घाटोडी येथे केली जाते. येथे ही फारशी सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बँरेल आणल्या जातात. परंतु त्या संपल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी नजीकच्या चहाटपरीचा आधार घ्यावा लागतो. बाजार समितीच्या कारभारात मागील काही वर्षांपासून ढिसाळपणा आला आहे.

यात नऊ संचालकांचे राजीनामा नाट्य, त्यांच्या जागी दुसऱ्या संचालकांची वर्णी, सभापतींनी दिलेला राजीनामा व संचालकांच्या विरोधानंतरही दिल गेलेल सभापतिपद, पगारासाठी कर्मचारीवर्गाने प्रारंभ केलेले उपोषण व आश्‍वासन देऊन पूर्ण न केलेल्या मागण्या या घडामोडीमुळे बाजार समिती चर्चेत राहिली. एकंदरीतच पुसद बाजार समितीला गतवैभव केव्हा प्राप्त होईल? याकडे शेतकरी लक्ष देऊन आशाळभूत नजरेने पाहत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com