Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market: गुढीपाडव्याला फुलबाजार बहरला

Flower Demands: गुढीपाडव्यानिमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात दोन दिवसांपासून फुलांची आवक आणि मागणी वाढली आहे. झेंडू, गुलछडी, शेवंती आणि अष्टर या फुलांना विशेष मागणी आहे, आणि त्याचे दर देखील चांगले राहिले आहेत.

गणेश कोरे

Pune News: फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात दोन दिवसांपासून फुलांची आवक आणि मागणी वाढली आहे. शनिवारी (ता. २९) फुलांची पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर जिल्ह्यांमधून आवक झाली होती. यामध्ये झेंडूच्या फुलांचा मोठा समावेश होता.

फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी दसरा, नवरात्र, दिवाळी या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला फुलांना हक्काचा दर मिळतो. यासाठी शेतकरी लागवडीचे नियोजन करत असतात. आणि सणासाठी मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रतीची फुले राखून ठेवतात.

फुलबाजारात गुरुवार, शुक्रवारपासून पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली. शनिवारी (ता.२९) फुलांची आवक वाढून देखील चांगल्या प्रतीच्या फुलांना चांगले दर मिळाल्याची माहिती फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

सणांना दोन दिवस अगोदर हार, तोरण, तसेच सजावटीसाठी फुलांना मागणी असते. सजावटकार, किरकोळ बाजारातील फूल विक्रेत्यांकडून फुलांच्या मागणीत वाढ होते. गुलछडी, शेवंती, अष्टर, झेंडू या फुलांना मागणी वाढली आहे. दोन दिवसांत एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार ५० ते ६० रुपये दर मिळाले होते. यंदा पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून दर देखील टिकून आहेत.

शनिवारी (ता.२९) फुलांचे एक किलोचे दर

झेंडू - ४० ते ७० रुपये

गुलछडी - २०० ते ३०० रुपये

शेवंती - ८० ते १५० रुपये

ॲस्टर - १२० ते १८० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT