Rice Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rice Market: इथेनाॅल निर्मितीसाठी सवलतीच्या दरातील तांदूळ पुरवठा बंद

Ethanol Production : देशाचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करून विदेशी चलनाची बचत करण्यासाठी तसेच प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने इथेनाॅल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला.

Team Agrowon

Pune News : देशात तांदळाचे भाव वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. आता केंद्राने धान्यापासून इथेनाॅल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सवलतीच्या दरात तांदूळ देणे बंद केले. यामुळे कारखान्यांच्या इथेनाॅल निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशाचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करून विदेशी चलनाची बचत करण्यासाठी तसेच प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने इथेनाॅल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देशातील इंधनामध्ये इथेनाॅल मित्रणाचे प्रमाणं २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत देशात इथेनाॅल मिश्रणाचे प्रमाण ११.६५ टक्क्यांवर पोचले आहे.

देशात इथेनाॅलचे उत्पादन वाढावे यासाठी सरकारने टाकाऊ धान्यापासून इथेनाॅल निर्मितीला परवानगी दिली. भारतीय अन्न महामंडळ कारखान्यांना सवलतीच्या दरात म्हणजेच २० रुपये किलोने इथेनाॅल निर्मितीसाठी तांदूळ देते. तेल विपणन कंपन्या कारखान्यांकडून ५८.५० रुपये प्रतिलिटरने धान्यापासून निर्मित इथेनाॅलची खरेदी करतात. तर खराब तांदळापासून निर्मिती झालेल्या तांदळाची खरेदी ५५.५४ रुपये लिटरने केली जाते.

पण धान्यापासून इथेनाॅल निर्मितीच्या उद्देशावर अनेकदा आक्षेप घेण्यात आले. कारखाने सवलतीच्या दरात सरकारकडून खरेदी करून खुल्या बाजारात जास्त दराने धान्य विकत असल्याचा आरोप केले गेले. सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून तांदळाचा वापर इथेनाॅल निर्मितीसाठी कार्यक्षमपणे होतो का? याची चौकशी केली जात आहे.

भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ मिळत नसल्याने महाराष्ट्रातील १५ ते १६ कारखाने आणि उत्तर प्रदेशातील १० ते १२ कारखान्यांची इथेनाॅल निर्मिती थांबल्याची माहिती आहे. पण तरीही सरकारच्या उद्दीष्टावर याचा काही परिणाम होणार नाही. तसेच देशात इथेनाॅलचा पुरेसा पुरवठा राहील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला.

दुसरीकडे कारखान्यांनी धान्यापासून निर्मित इथेनाॅलचा भाव वाढविण्यासाची मागणी केली आहे. कारण धान्याचे भाव वाढले आहेत. सरकारने २०२२-२३ च्या हंगामात दर निश्चित केल्यानंतर दरात मोठी वाढ झाली, असे कारखान्यांनी म्हटले आहे.

देशातील बाजारात २०२२मध्ये मार्च आणि एप्रिलमहिन्यात तांदळाचे भाव १६ ते १७ रुपये प्रतिकिलो होते. ते जुलै २०२३ मध्ये वाढून २१ ते २२ रुपयांवर पोचले. त्यामुळे सर्व कारखाने भारतीय अन्न महामंडळाकडे खरेदीसाठी गेले.

कारखान्यांची मागणी वाढल्याने महामंडळाने चालू वर्षात डिसेंबर ते जून या काळात १३ लाख टन तांदळाचा पुरवठा केला. २०२१-२२ च्या संपूर्ण हंगामात १० लाख टन तांदळाचा पुरवठा इथेनाॅल निर्मितीसाठी केला होता. यंदा इथेनाॅल निर्मितीसाठी वाढलेला तांदळाचा पुरवठा, वादात सापडलेली तांदळापासून इथेनाॅल निर्मिती आणि खुल्या बाजारात वाढलेले भाव यामुळे सरकारने कारखान्यांना सवलतीच्या दरात तांदूळ देणे बंद करण्याचा निर्णय घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT