Rural Development Initiative: गावांच्या वाढत्या विकास गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी ९० लाख रुपयांपर्यंत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..सध्या जिल्हा वार्षिक योजनेत ‘ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ या घटकातून निधी दिला जातो. या योजनेचे निकष २०१० मध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींच्या विकासकामांची व्याप्ती वाढल्याने नव्या गरजांसाठी स्वतंत्र निधीची मागणी होत होती. त्यानुसार शासनाने पाच नव्या योजनांना मंजुरी दिली आहे..Gram Panchayat Development Plan: पंचायत विकास आराखडा का ठरतोय महत्त्वाचा?.या योजनांमध्ये गावाच्या हद्दीतील शासकीय पडीक जागांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी २० लाख रुपये, वाचनालय इमारतीसाठी २० लाख रुपये, क्रीडांगण विकासासाठी २० लाख रुपये आणि सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्थेसाठी १५ लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे..दुहेरी निधीला मनाईग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार, या पाच योजनांतील मंजूर कामांसाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून पुन्हा निधी घेता येणार नाही. एकाच कामासाठी दुहेरी निधीचा वापर होऊ नये, यासाठी ही अट घालण्यात आली आहे..Village Development: राज्यातील सरपंचांना सोबत घेत गावे समृद्ध करणार; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा निर्धार.राज्य सरपंच परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न झाल्याने प्रशासक नियुक्त आहेत. या प्रशासकांना आर्थिक अधिकार नसल्यामुळे मंजूर निधी खर्च करता येत नसल्याची खंत परिषदेने व्यक्त केली आहे. त्यामुळे आधीची विकासकामे तसेच नव्या योजनांची अंमलबजावणीही अडचणीत येत असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे..राज्यातील ग्रामपंचायतींना विकासासाठी नव्या योजना आणि निधी उपलब्ध झाला आहे. मात्र प्रशासकांना निधी खर्च करण्याचे अधिकार नसल्याने विकासकामे रखडली आहेत. ग्रामविकास विभागाने हा पेच तातडीने सोडवावा. दत्ता काकडे, प्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.