Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : उन्हाळ कांदा बाजार समितीत दाखल

Onion Rate : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवार (ता.५) उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाला. या कांद्याला सर्वाधिक २ हजार २०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Team Agrowon

Nashik News : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवार (ता.५) उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाला. या कांद्याला सर्वाधिक २ हजार २०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

या हंगामात प्रथमच देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी सतीश आहेर यांच्या वाहनाचे पूजन करून शेतकरी श्री.आहेर यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

श्री. आहेर यांनी जवळपास ६० क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. दरम्यान जिल्ह्यात अजून काही ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड सुरु आहे. देवळा तालुक्यात जवळपास जानेवारी अखेर कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे.

सद्या लाल कांद्याची आवक अजूनपर्यंत टिकून आहे. तालुक्यात प्रथमच या हंगामातील उन्हाळी कांदा विक्रीसाठी देवळा बाजार समितीमध्ये दाखल झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी सभापती योगेश आहेर, उपसभापती शिवाजी आहिरे, संचालक भाऊसाहेब पगार, विजय सोनवणे, अभिमान पवार, शिवाजी पवार, अभिजित निकम, धनश्री आहेर, विशाखा पवार, दिलीप पाटील, दीपक बच्छाव, शाहू शिरसाठ, रेश्मा महाजन, भास्कर माळी, शीतल गुंजाळ, संजय शिंदे, निंबा धामणे, भावराव नवले आदींसह कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT