Onion Market : कांदा कोसळला! संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव पाडला बंद

Lasalgaon Market Committee : कांद्याचे भाव गेल्या काही दिवसापासून पडत असून शेतकरी संतप्त झाले आहेत. आता कांद्याचे भाव कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
Lasalgaon market committee
Lasalgaon market committeeAgrowon
Published on
Updated on

Nashik News : गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरुच आहे. आजही (ता.१९) कांद्याच्या भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. तर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले. तसेच कांदा निर्यातीवर असलेले २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मागील आठवड्याभरापासून राज्यभरातील बाजारात कांद्याचे भाव गडगडले होते. आतापर्यंत बाजारात कांद्याच्या भावात १ हजार ते २ हजारांनी कमी झाले त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा स्वस्त कांदा निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात येत आहे. त्यामुळे भारतातील कांद्याला याचा फटका बसत असून कांद्याचे भाव पडले आहेत. यामुळे कांदा राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत.

Lasalgaon market committee
Onion Export Duty : वीस टक्के निर्यातशुल्काची कांदा निर्यातवाढीला आडकाठी

दरम्यान लासलगावसह देशांतर्गत बाजारात खरीप कांद्याची आवक झाली आहे. गेल्या दहा दिवसापासून लासलगाव बाजार समितीतही मोठी आवक झाली असून कांद्याच्या बाजारभावात २५०० रुपयांची घसरण नोंदवली आहे. आजही बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात ८०० वाहनातून कांद्याची आवक झाली. तर कांद्याचे सरासरी बाजार भाव १६०० ते १७०० रुपयांपर्यंत कोसळले.

बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त २५११ रुपये, तर कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १६०० रुपये भाव मिळाला आहे. दररोज होणाऱ्या कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी कांद्याचे होणारे लिलाव बंद पडून निषेध व्यक्त केला.

Lasalgaon market committee
NAFED Onion Procurement : ‘नाफेड’च्या भ्रष्टाचाराबाबत कारवाई करा

निर्यात शुल्क हटवा, अनुदान द्या

सतत पडणाऱ्या कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीवर असलेले २० टक्के निर्यात शुल्क हटवण्यासह विक्री झालेल्या कांद्याला १ हजार ते २ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सोलापूर कांद्याचे लिलाव ठप्प

दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी काम बंद आदोलन पुकारले आहे. यानंतर प्रशासन आणि कामगारांमध्ये बैठक झाली असून माथाडी कामगार आज (ता.१९) दिवसभर काम बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे आज बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होणार नाही. पण शेतकऱ्यांनी समितीमध्ये आणलेला कांदा घेतील. उद्या (ता.२०) सकाळी नेहमीप्रमाणे कांद्याचे लिलाव होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com