Sugarcane Crushing Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane Crushing : साखर कारखान्यांची उद्दिष्टपूर्तीसाठी धडपड

राज्याच्या ऊस पट्ट्यातील ऊस हंगाम झपाट्याने अंतिम टप्प्याकडे चालला आहे. विशेष करून पश्‍चिम-दक्षिण पट्ट्यातील साखर कारखाने गतीने शेवटच्या टप्प्यात गेले आहेत.

Raj Chougule

Sugarcane Crushing Season कोल्हापूर ः राज्याच्या ऊस पट्ट्यातील ऊस हंगाम (Sugarcane Crushing Season) झपाट्याने अंतिम टप्प्याकडे चालला आहे. विशेष करून पश्‍चिम-दक्षिण पट्ट्यातील साखर कारखाने (Sugar Mills) गतीने शेवटच्या टप्प्यात गेले आहेत.

येत्या पंधरा दिवसांत या भागातील सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. अनेक कारखान्यांचे जादा गाळपाचे (Sugarcane Crushing) अंदाज या वर्षी चुकीचे ठरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीचा गाळपाचा आकडाही कारखाने क्वचितच गाठतील, अशी शक्यता आहे. अग्रगण्य कारखानेही यंदा उद्दिष्टपूर्तीसाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. यंदाचा हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा अनेक साखर कारखान्यांनी यंदा गाळप क्षमता वाढविली आहे. गेल्या वर्षी राज्याचे दैनंदिन गाळप क्षमता ८ लाख २८ हजार ६५० टन होती. यंदा ती ८ लाख ६९ हजार ४५० टनांपर्यंत गेली आहे. याचाही परिणाम जलद गाळपावर होत आहे.

२५ फेब्रुवारीअखेर संपलेल्या हंगामामध्ये १४ साखर कारखाने बंद झाले आहेत. कारखाने बंद होण्याचा सर्वाधिक वेग सोलापूर विभागाचा आहे. या विभागातील ८ कारखाने बंद झाले आहेत. पुणे व नगर मधील प्रत्येकी दोन कारखाने बंद झाले आहेत.

कोल्हापूर व नांदेड विभागातील एक कारखाना बंद झाला आहे. ९३३ लाख टन ऊस गाळप झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ९१७ लाख टन ऊस गाळप झाले होते.

९३९ लाख क्विंटल साखर गेल्या वर्षी तयार झाली होती. यंदा ९३४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उताराही १० टक्क्यांपर्यंत आहे. गेल्या वर्षी १०.२५ टक्के साखर उतारा होता.

यंदा राज्यातील कोणत्याच भागात अतिरिक्त उसाची समस्या फारशी जाणवणार नसल्याची स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश कारखाने १५ मार्चपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे.

उर्वरित भागातील कारखाने मार्चअखेरपर्यंत आपला हंगाम संपवतील. क्वचित कारखाने एप्रिल मध्य ते मे पर्यंत सुरू रहातील, असा अंदाज आहे.

गेल्या वर्षी हंगाम लांबल्याने कोल्हापूर, सांगली भागातील ऊस तोडणी यंत्रे मराठवाड्यात ऊस तोडणीसाठी गेली होती. यंदा मात्र अशी परिस्थीती नसल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

(२५ फेब्रुवारीअखेरची स्थिती)

विभाग सुरू कारखाने गाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल)

कोल्हापूर ३६ २१४ २४४

पुणे ३१ १९६ १९५

सोलापूर ४९ २१२ १९९

अहमदनगर २७ ११८ ११२

औरंगाबाद २५ ८९ ८२

नांदेड २९ ९१ ९०

अमरावती ३ ७ ६

नागपूर ४ ४ ३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT