कर्ज परतफेडीसाठी मुदत तीन ते पाच वर्षएका म्हशीसाठी दीड लाख, दोन म्हशींसाठी तीन लाख रुपये कर्ज मिळणारशेतकरी दूध पुरवठा करत असलेल्या दूध संस्था आणि दूध संघाच्या हमीवर होणार अर्थ पुरवठाकेवळ घरठाण उताऱ्यावर कर्ज मिळणारबँकेकडून लाभार्थ्यास दिले जाणार १० हजार रुपये अनुदान.Kolhapur Jilha Bank Dhaval Kranti Scheme : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (KDCC) बँकेने परराज्यांतून दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी धवलक्रांती योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे शेतकरी दूध पुरवठा करीत असलेल्या दूध संस्था आणि दूध संघाच्या हमीवर यासाठी अर्थ पुरवठा होणार आहे. या योजनेनुसार अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजुरांनाही आर्थिक भांडवल मिळणार आहे. .याबाबतचा निर्णय ‘केडीसीसी’चे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केवळ घरठाण उताऱ्यावर यासाठी कर्ज मिळणार आहे..Sangli Jilha Bank : अपहाराच्या साडेचार कोटींतील पावणेतीन कोटी वसूल.जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांना परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून १२ टक्के व्याज परतावा आणि व्याज अनुदान कर्ज योजनेंतर्गत म्हशी खरेदी करण्यासाठी योजना सुरूच आहे..Kolhapur Jilha Bank : २० गुंठे जमिनीवर मिळणार ५ लाख रुपये कर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेची मोठी संधी.या योजनेअंतर्गत गोकुळ दूध संघ आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या हमीपत्रावर परराज्यातील म्हशी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, महामंडळाकडून व्याज परताव्यासाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ होत आहे. या विलंबाने मिळणाऱ्या व्याज परताव्यामुळे कर्जदारांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी या धोरणाव्यतिरिक परराज्यातील जातिवंत म्हशी खरेदीसाठी कर्ज पुरवठा करण्याची मागणी होत होती. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत दोन म्हैस खरेदी करण्यासाठी 'धवलक्रांती मध्यम मुदत कर्ज योजना' धोरण मंजूर केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.