डॉ.नितीन गडगिळे, डॉ. ऋषभ घुलेLivestock Health: लसीकरण करण्यापूर्वी जनावराचे आरोग्य तपासणी करावी. आजारी, अशक्त किंवा ताप असलेल्या जनावरांना लस देऊ नये. योग्य वयाच्या जनावरास योग्य वेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. .जनावरांना योग्य काळात लसीकरण केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.आजाराला प्रतिबंध घातला जातो. प्राणीजन्य आजार म्हणजेच जनावरांपासून माणसांना होणारे आजार जसे की रेबीज, क्षयरोग, स्वाइन फ्ल्यू, ब्रुसेलोसिस यांना आळा बसतो.जनावरांची उत्पादन क्षमता वाढते रोगाचा प्रसार थांबतो. सार्वजनिक आरोग्य अबाधित राहते..Animal Vaccination : खानदेशात पशुधन लसीकरण संथच.पावसाळ्यानंतरचे लसीकरणघटसर्प आणि फऱ्या रोगाचे लसीकरण पावसाळ्याआधी किंवा त्यानंतर (ऑगस्ट -सप्टेंबर) मध्येदरवर्षी एकदाच केले जाते. लाळ्या खुरकूतचे लसीकरण सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान करावे. दर ६ महिन्यांनी,म्हणजेच २ वेळा लसीकरण करावे. तरच रोगाचा प्रतिबंध होऊ शकतो. गोवंश, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण केले जाते..पीपीआर (शेळी प्लेग) : हा शेळ्या, मेंढ्यांना होणारा विषाणूजन्य आजार आहे.याचे लसीकरण सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान केले जाते. दर ३ वर्षांनी एकदाच लसीकरण करावे.ब्रुसेलोसीसचे लसीकरण फक्त मादी वासरांसाठी ४ ते ८ महिने वयाच्या काळात पावसाळ्यानंतर करावे.रेबीज नियंत्रणासाठी श्वान, मांजरांना पावसाळ्यानंतर दरवर्षी एकदा लसीकरण करावे..Animal Vaccination : पशुधनांना ९० टक्के लसीकरण.लसीकरणावेळी घ्यावयाची काळजीलसीकरणापूर्वी जनावराचे आरोग्य तपासावे. आजारी, अशक्त किंवा ताप असलेल्या जनावरांना लस देऊ नये.योग्य वयाच्या जनावरास योग्य वेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाचे पालन करावे. त्या भागातील रोगस्थिती व नोंदणीकृत पशुवैद्यकांचे मार्गदर्शन, योग्य लसीचा वापर करावा..लस योग्य तापमानात साठवाव्यात. लस उष्णतेस संवेदनशील असल्याने त्या नेहमी थंड ठेवाव्यात.लसीकरणाची तारीख व लसीचे नाव याची नोंद ठेवावी.लसीकरणाच्या दिवशी आणि त्यानंतर जनावरांना चांगला व संतुलित आहार व स्वच्छ पाणी द्यावे. जास्त श्रम किंवा लांब प्रवास टाळावा..लसीकरणाबाबत गैरसमजाचा खुलासालसीकरणामुळे प्राणी आजारी होतातलसीकरणामुळे रोगाची प्रतिबंधक क्षमता वाढते. कधीकधी सौम्य ताप किंवा सूज दिसू शकते, पण ती तात्पुरती असते.एकदा लस दिली की आयुष्यभर रोग होत नाहीबहुतेक लसीचा परिणाम ठरावीक कालावधीपर्यंतच राहतो. ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुन्हा लसीकरण (बूस्टर डोस) आवश्यक असतो..लस दिलेल्या जनावरांचे दूध, मांस वापरू नये.बहुतेक लशीमुळे दूध किंवा मांसावर विपरीत परिणाम होत नाही. मात्र विशेष लसीकरणासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.लसीकरणामुळे दुधाचे प्रमाण कमी होते.लसीकरणामुळे दूध उत्पादनावर परिणाम होत नाही. उलट जनावरे रोगांपासून सुरक्षित राहिल्यामुळे उत्पादन स्थिर राहते.लसीकरणानंतर काही दिवस जनावरांना इतर आजारी जनावरांपासून दूर ठेवावे, गर्दी टाळणे फायद्याचे असते.- डॉ .नितीन गडगिळे ७६६६२३३४१२(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.