Sugarcane Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane : नवीन ऊस लावणीला वेग

पावसाचा जोर थांबला असून महापुराची भीतीही कमी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर नवीन ऊस लावणीत शेतकऱ्यांनी लक्ष घातले आहे.

टीम ॲग्रोवन

इचलकरंजी, जि. कोल्हापूर ः पावसाचा जोर (Rain) थांबला असून महापुराची (Kolhapur Flood) भीतीही कमी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर नवीन ऊस लावणीत (Sugarcane Cultivation) शेतकऱ्यांनी लक्ष घातले आहे. सध्याचे वातावरणात पोषक असल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे. सततच्या पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील नवीन लावण्या थांबल्या होत्या. सध्या या लावणीचे प्रमाण केवळ ८.८६ टक्के आहे. येत्या काही दिवसांत नवीन लावणीचा टक्का वाढणार आहे.

तालुक्यात निम्म्याहून अधिक शेतीच्या क्षेत्रात उसाच्या नवीन लावण्या केल्या जातात. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या लावण्या थांबल्या होत्या. पावसाचा जोर असताना ऑगस्टमध्येच नवीन लावणीला गती येऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आता पावसाने उघडीप दिल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. पावसाचा जोर खरिपातील अन्य पिकांना पोषक असला तरी नवीन लावणीसाठी धोक्याचा इशारा होता. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचे लावणीसाठी धाडस होत आहे. जुलै महिना नवीन लावणीसाठी पाऊस असून, कोरडा जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना आता जुलैमध्येच लावणीला गती मिळणार आहे.

खरिपातील पेरण्या आटोपून घरी बसलेल्या शेतमजुरांना सांगावा धाडला जात आहे. शेतकऱ्यांची लावणीसाठी लगबग वाढली आहे. पावसाचा अंदाज घेत लावण्या केल्या जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सध्या झालेल्या पावसाचे प्रमाण कमी आहे; मात्र पेरणीसाठी पोषक आहे. सिंचनाच्या योग्य सुविधा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे नवीन लावण्यांना शेतकऱ्यांनी हात घातला आहे. योग्यवेळी लावण्या झाल्यास अपेक्षित उत्पन्न आणि शेतकऱ्यांची आर्थिक चाके प्रवाहित राहतात.

नदीकाठच्या लावण्या ऑगस्टमध्ये

सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी नदीकाठच्या लावण्यांना ऑगस्टमध्येच गती मिळते. तीन वर्षांतील महापुराचा नेमका अंदाज घेत नवीन लावणीसाठी नदीतकाठचे शेतकरी थोडा विलंब स्वीकारत आहे. यामुळे नुकसान टाळले जाते आणि महापुराचा धोका पूर्ण टळतो.

ऊस रोपवाटिका प्रफुल्लित

पावसामुळे ऊस रोपवाटिकांची थांबलेली चाके पुन्हा गतिमान झाली आहेत. नदीकाठचे शेतकरी ऑगस्टच्या तयारीने रोपांची मागणी आतापासून नोंदवत आहेत. त्यामुळे रोपवाटिका व्यावसायिकांचा हंगाम प्रफुल्लित झाला आहे.

हातकणंगले तालुका लावणी स्थिती

सरासरी पेरणी क्षेत्र - २५ हजार ६९० हेक्टर

प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र - २ हजार २७८ हेक्टर

टक्के - ८.८६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT