वालचंदनगर ः भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने (Chhatraprti Sugar Factory) २०२२-२३ गळीत हंगामामध्ये (Crushing Season) १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट (Target For Sugarcane Crushing) ठेवले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे (Prashant Kate) व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते गळीत हंगामासाठीच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. या वेळी काटे यांनी सांगितले की, सन २०२२-२३ च्या गळीत हंगामाची तयारी सुरू आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ११ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा ३ लाख टन ऊस गाळपास घेऊन १४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. यासाठी उसतोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत ५८३ ट्रॅक्टरचे, १००० बैलगाडीचे व ६६० ट्रॅक्टर गाडीचे करार पूर्ण झाले आहेत.
तसेच, कारखान्यामध्ये मशिनरी ओव्हरहॉलिंग व रिपेअरिंगची कामे वेगाने चालू आहेत. सदरची कामे लवकर पूर्ण करून कारखान्याची दोन्ही युनिट १ ऑक्टोबरपर्यंत गाळपासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. गतवर्षी कारखान्याने १२ लाख ५१ हजार ७९५ टन उसाचे गाळप केले होते. मिल रोलरच्या पूजन प्रसंगी कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, अॅड. रणजित निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, संतोष ढवाण, गणेश झगडे, दत्तात्रेय सपकाळ, निवृत्ती सोनवणे, गोपीचंद शिंदे, रसिक सरक, तेजश्री देवकाते पाटील, कार्यकारी संचालक अशोक जाधव उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.