Soymeal Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soymeal Export : सोयापेंड निर्यात पोहोचली १४ लाख ५३ हजार टनांवर

Soybean Market : यंदा देशातील सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढले. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही जास्त होता. त्यामुळे यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला.

अनिल जाधव

Pune News : यंदा देशातील सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढले. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही जास्त होता. त्यामुळे यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. देशात मे महिन्यापर्यंत बाजारातील आवक गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहिली. बाजारात मे पर्यंत ९१ लाख टनांची आवक झाली. तर सोयापेंड निर्यात १४ लाख ५३ हजार टनांवर पोहोचली, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सोपा’ने सांगितले.

देशातील बाजारात मागील चार महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा असल्याने माल मागे ठेवला. पण शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव अजून मिळाला नाही.

मागील हंगामात सोयाबीनला ८ हजारांचा भाव पहिल्यानंतर यंदाही बाजार याच दिशेने जाईल, अशी आशा होती. पण गेल्यावर्षी मार्चनंतर वाढलेला सोयाबीन बाजार यंदा मात्र दबावात आला. चालू हंगामात सोयाबीनने ६ हजारांचाही टप्पा पार केला नाही. परिणामी अजूनही अनेक शेतकरी सोयाबीनचा स्टॉक ठेवून आहेत.

‘सोपा’ने मे महिन्याच्या अंदाजात यंदा बाजारातील आवक वाढल्याचे म्हटले आहे. ‘सोपा’च्या मते, ऑक्टोबर ते मे या काळात देशातील बाजारात ९१ लाख टन सोयाबीनची आवक झाली होती.

गेल्या हंगामात याच काळातील आवक ७० लाख टन होती. म्हणजेच यंदा २१ लाख टनांनी जास्त आवक राहिली. यंदा गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन पुरवठा जास्त असला तरी बाजारातील आवक जास्त झाल्याने आता शिल्लक माल कमी राहिला.

देशाचा सोयापेंड वापर वाढला

देशातील सोयापेंड वापराचा विचार करता यंदा मानवी आहार आणि पशुखाद्यतही वापर वाढला आहे. मानवी आहारात सोयापेंडचा वापर यंदा १ लाख टनांनी वाढून ६ लाख २५ हजार टनांवर पोहोचला. पशुखाद्यातील वापरही साडेतीन लाख टनांनी वाढला. देशातील पशुखाद्य उद्योगाने आतापर्यंत ४२ लाख ५० हजार टनांची उचल केली, असेही ‘सोपा’ने म्हटले आहे.

सोयापेंड निर्यातीची झेप

सोयापेंड निर्यातीचा विचार करता मे महिन्यापर्यंत देशातून १४ लाख ५३ हजार टनांची निर्यात झाली, असे ‘सोपा’ने स्पष्ट केले. गेल्या हंगामातील निर्यात ५ लाख टन होती. म्हणजेच यंदाची निर्यात जवळपास तीन पटीने जास्त आहे.

महिनानिहाय निर्यातीचा विचार करता मार्चमध्ये विक्रमी सव्वातीन लाख टनांची निर्यात झाली. तर मे मध्ये ७५ हजार टन सोयापेंड भारताने इतर देशांना दिली. देशात मे पर्यंत जवळपास ६२ लाख टनांची निर्मिती झाली होती. जी गेल्यावर्षीपेक्षा जवळपास १८ लाख टनांनी जास्त होती.

५९ लाख टन सोयाबीन साठा शिल्लक

‘सोपा’च्या मते, यंदा देशात १२४ लाख टनांचे उत्पादन झाले. तर मागील हंगामातील २५ लाख टन शिल्लक साठा होता. त्यामुळे यंदा १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. जो गेल्यावर्षीपेक्षा २८ लाख टनांनी जास्त होता.

यंदा एकूण पुरवठ्यापैकी ९१ लाख टन सोयाबीन मे पर्यंत बाजारात आले. आता शेतकरी, प्रक्रिया प्लांट्स, व्यापारी यांच्याकडे ५९ लाख टनांचा स्टॉक आहे. गेल्या हंगामात हा ५३ लाख टनांचा होता, असेही ‘सोपा’ने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT