Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : सोयाबीन भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, आले तसेच तूर दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा चढ उतार सुरु झाले. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही वायद्यांमध्ये आज कालच्या तुलनेत नरमाई दिसून आली. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७४.८८ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार ८०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी झाली. कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या बाजारातही चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई आली होती. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.४१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

मागील वर्षभर आल्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीच्या भावातील नरमाई कायम आहे. आजही ज्वारीचे भाव अनेक बाजारांमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर भाव कमी झाले आहेत. शेतकरी आजही भाववाढीची वाट पाहत आहेत. ज्वारीला मागील तीन महिन्यांपासून २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT