Tur Market: तुरीच्या भावात काही ठिकाणी थोडीशी नरमाई

Market Update : तुरीच्या बाजारात चढ उतार राहतील. मात्र दरात फार मोठी घट होण्याची शक्यता खूपच कमी असून दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे. अर्जेंटीनातील रोसारियो ग्रेन्स एक्सचेंजने अर्जेंटीनाच्या सोयाबीन उत्पादनाचा अंदाज २० लाख टनांनी वाढवून ५२० लाख टनांपर्यंत नेला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा नरमाई आली. सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव कमी झाले होते.

तर देशातली बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील आवकही टिकून आहे. बाजारात पुढच्या काळातही दरातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशात कापासाची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्यानंतर देशातून निर्यात वाढत आहे. तसेच बाजारातील कापूस आवक दिसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याचाही आधार कापूस भावाला मिळत आहे. कापसाच्या सरासरी भावात मागील तीन दिवसांमध्ये १०० रुपयांपर्यंत वाढ दिसून आली.

तर कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. यापुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur
Tur Rate : विदर्भात तूर पोचली दहा हजार रुपयांवर

तुरीच्या भावात मागील आठवडाभरापासून काहीशी नरमाई आली आहे. तुरीचा सरासरी भाव ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील नव्या मालाची आवक तसेच आफ्रिकेतून आयातीचा मार्ग मोकळा होण्याच्या शक्यतेने तुरीच्या बाजारावर परिणाम झाला. पण तुरीचा बाजार जास्त दबावात येण्याच शक्यता नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करताना बाजारातील चढ उताराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच तुरीच्या बाजारात चढ उतार राहतील. मात्र दरात फार मोठी घट होण्याची शक्यता खूपच कमी असून दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. 

Tur
Tur Rate : हिंगोलीत तुरीला क्विंटलला ८९०० ते ९८०० रुपये दर

देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावातच आहेत. कांदा मागील काही आठवड्यांपासून १ हजार ते १२०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. देशात कांदा स्वस्त असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कांद्याचे भाव खूपच वाढले आहेत.

त्यामुळे देशातून कांद्याची तस्करी देखील केली जात आहे. यामुळे एकीकडे कांदा उत्पादक संकटात असताना तस्करांना मात्र चांगलाच फायदा होत आहे. कांद्याचे भाव दबावात आल्याने कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

हळदीचे भाव सध्या टिकून आहेत. नव्या मालाची आवक सुरु होण्याच्या ऐन काळातही भाव तेजीतच दिसतात. त्याचे महत्वाचे कारण आहे बाजारातील कमी असलेली आवक. तसेच मागील हंगामातील शिल्लक स्टाॅकही कमी आहे. नव्या मालाचे उत्पादनही कमीच राहण्याची शक्यता आहे.

या कारणांमुळे हळदीचे भाव सध्या १२ हजार ते २१ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीप्रमाणे भाव मिळत आहे. यंदा उत्पादनातही घट येणार असल्याने हळदीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com