Palm Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Palm Oil Price Rise: पामतेलाच्या भावात मोठी तेजी सोयाबीनच्या मुळावर; सोयाबीनचे गाळप वाढल्याने किमती दबावात

Market Update : पामतेलाचा पुरवठा कमी झाल्याने सोयातेल आणि सूर्यफुल तेलापेक्षा महाग झाले. सूर्यफुल तेलाचा पुरठाही मर्यादीत आहे. सोयाबीनची उपलब्ध मात्र मुबलक असल्याने गाळप वाढत आहे.

Anil Jadhao 

Pune News : पामतेलाचा पुरवठा कमी झाल्याने सोयातेल आणि सूर्यफुल तेलापेक्षा महाग झाले. सूर्यफुल तेलाचा पुरठाही मर्यादीत आहे. सोयाबीनची उपलब्ध मात्र मुबलक असल्याने गाळप वाढत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव दबावात आले. अर्जेंटीनातून भारतात सोयातेल आयातीचा लोंढा वाढला. या घडामोडींचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर होत आहे. 

जागतिक बाजारात पहिल्यांदा पामेलाचे भाव सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा जास्त झाले आहेत. मलेशियातील पुरामुळे उत्पादनावर झालेला परिणाम आणि इंडोनेशियाने निर्यात शुल्कात केलेली वाढ तसेच जैवइंधनासाठी पामतेलाचा वाढवलेला वापर यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाला चांगलीच फोडणी मिळाली. एकेकाळी गरिबांचे तेल म्हणून ओळखले जाणारे पामतेल आता सर्वात महाग झाले.

द साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आयात होणाऱ्या तेलामध्ये पामतेलाचे भाव जास्त आहेत. सध्या कच्च्या पामतेलाचे भाव टनामागे कच्च्या सोयातेलापेक्षा १२२ डाॅलरने जास्त आहेत. तर कच्च्या सूर्यफुल तेलापेक्षा ६५ डाॅलरने जास्त आहेत. रिफाईंड पामतेलाचे भावही रिफाईंड सोयातेल आणि रिफाईंड सूर्यफुल तेलापेक्षा जास्त आहेत मात्र दरात फरक काहीसा कमी आहे.

इंडोनेशियाने ऱिफायनिंगची क्षमता वाढवली आहे. त्याचा फटका भारतातील रिफायनरिंना बसत आहे. त्यातच इंडोनेशिया रिफाईंड पामतेल निर्यातीला अनुदानही देत आहे. मात्र कच्चे पामतेल निर्यातीवर निर्यात शुल्क लावत आहे. त्यामुळे कच्चे पामतेल कच्चे सोयातेल आणि कच्चे सूर्यफुल तेलाच्या तुलनेत जास्त महाग झाले. पण रिफाईंड पामतेल रिफाईंड सोयातेल तसेच सूर्यफुल तेलाच्या भावातील फरक कमी आहे. म्हणजेच रिफाईंड पामतेल तुलनेत स्वस्त पडत आहे.

आयातीच्या आलेखात बदल

आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात बदलत्या समिकरणांमुळे भारताच्या खाद्यतेल आयातीतही बदल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात भारताच्या सोयाबीन तेलाच्या आयातीत १७२ टक्के वाढ झाली. तर रिफाईंड पामतेलाच्या आयातीत ६६ टक्के वाढ झाली. मात्र कच्च्या पामतेलाच्या आय़ातीत २१ टक्क्यांची घट झाली.

इंडोनेशियाचे धोरण

इंडोनेशियाने जानेवारी २०२५ पासून बी ४० धोरण लागू करण्याचे ठरवले आहे. म्हणजेच इंडोनेशिया ४० टक्के पामतेल जैवइंधनात वापरणार आहे. इंडोनेशियाच्या या धोरणामुळे २० लाख टन पामतेलाचा वापर जैवइंधनात होणार आहे. पामतेलाचा पुरवठा कमी करून किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना फायदा देण्यासाठी इंडोनेशियाने हा निर्णय़ घेतला आहे. त्यासाठी इंडोनेशियाने पामतेलापासून जैवइंधन निर्मितीसाठी उद्योगांची क्षमता वाढवली आहे. त्यामुळे जास्त पामतेलाचा वापर जैवइंधानासाठी होत असून पामतेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत आहे.

सोयातेलासाठी गाळप वाढले

पामतेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत आहेत. तर रशिया युक्रेनमधील तणामुळे सूर्यफुल तेलाचा पुरवठाही मर्यादीत झाला. त्यामुळे सोयातेलाला मागणी आली. सोयातेलाचेही भाव वाढत असल्याने अर्जेंटीनात सोयाबीनचे गाळप वाढले. परिणामी सोयापेंडचे साठे तयार झाले असून भाव कमी झाले आहेत. त्यातच चलनाचे मूल्य कमी झाल्याचा फायदा अर्जेंटीनाला मिळत आहे. पण भारतातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.

इंडोनेशियाचे धोरण आणि मलेशियातील अडचणी यामुळे पामतेलाचा पुरवठा कमी झाला. सध्या पामतेल जास्त किमतीने विकले जात आहे. यामुळे सोयातेलाला मागणी वाढली आणि गाळपही वाढत आहे. पण सोयापेंडचे साठे तयार झाल्याने किमती दबावात आहेत. 
बी.व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, द साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT