Palm Oil Update : भारताकडून एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द

Palm Oil Import Deals Cancelled : ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील १ लाख टनांचे आयात सौदे भारतीय रिफायनरींनी रद्द केले आहेत. भारत सर्वांत मोठा पामतेल आयात करणारा देश आहे.
Palm Oil
Palm Oil Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : भारताने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव वाढले. या परिस्थितीत गेल्या महिन्यात सौदे केलेले कच्चे तेल विकूनच रिफायनरींना सध्याच्या वाढलेल्या भावात फायदा दिसत आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील १ लाख टनांचे आयात सौदे भारतीय रिफायनरींनी रद्द केले आहेत. भारत सर्वांत मोठा पामतेल आयात करणारा देश आहे.

पण भारताने मागील आठवड्यात खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली. कच्चे पामतेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ होऊन आता २७.५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. भारताने आयात शुल्क लागू केल्यानंतर मलेशियाच्या वायदे बाजारात पामतलेच्या वायद्यांमध्ये वाढ झाली. मलेशियाच्या बाजारात सध्या पामतेलाचे वायदे जवळपास २ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे भारतातील रिफायनरींनी हे आयातीचे सौदे रद्द केले आहेत. मागील ५ दिवसांमध्येच हे सौदे रद्द करण्यात आले. सोमवारी एकाच दिवसात ५० हजार टनांचे सौदे रिफायनरींनी रद्द केले, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले.

Palm Oil
Palm Oil Import : भारताकडून एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द

भारतातील रिफायनरींनी आयातीचे सौदे रद्द केल्यानंतर मलेशियातील पामतेलाच्या दरातील वाढ मर्यादित होऊ शकते. तसेच काही रिफायनरी सोयातेलाकडे वळू शकतात. त्यामुळे सोयातेलाच्या भावाला आधार मिळू शकतो.

‘भारताची आयात शुल्कातील वाढ आणि मलेशियातील भाववाढ यामुळे प्रत्येकजण विचार करीत आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत नवे कच्चे तेल घेऊन रिफाइन करण्यापेक्षा खरेदीचे सौदे रद्द करण्यामध्येच रिफायनरींचा फायदा आहे. तेल विक्रेतेही वाढलेल्या दरात विक्री करत असल्याने सध्या समाधानी आहेत,’ असे आयातीचा सौदा रद्द केलेल्या रिफायनरी चालविण्यासाठी पामतेल खरेदीदाराने सांगितले. भारत महिन्याला जवळपास ७ लाख ५० हजार टनांची आयात करत असतो. त्यापैकी १ लाख टनांचे सौदे रद्द झाले. रद्द झालेले सौदे एका महिन्यातील आयातीच्या १३.३ टक्के आहे.

Palm Oil
Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्चे पामतेलाचे ऑक्टोबर आयातीचे सौदे आयात खर्च, विमा आणि फ्रेटच्या खर्चासह १ हजार ८० डॉलर प्रतिटनाने मिळत आहेत. तर मागील महिन्यात हाच भाव ९८० ते १ हजार डॉलर होता. त्या वेळी खरेदी केलेल्या खरेदीदारांना ८० ते १०० डॉलर प्रतिटनाचा फायदा होत आहे.

वाढलेल्या भावात डिसेंबरच्या तिमाहीत भाव कसे राहतील, याविषयी सर्वांना साशंकता आहे. तसेच खाद्यतेलाच्या किमती नेमक्या कुठे जातील याविषयी चिंता आहे. त्यामुळे रिफायनरी आयातीचे सौदे रद्द करीत आहेत.
संदीप बाजोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, सनविन ग्रुप
पूर्व किनाऱ्यावरील रिफायनरींना सौदे रद्द केल्यानंतर चांगला फायदा होत आहे. त्यामुळे येथील रिफायनरी आयातीच्या सौद्यातून बाहेर पडत आहेत.
आशीष आचार्या, उपाध्यक्ष, पतंजली फूड्स लिमिटेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com