Soybean Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

माणिक रासवे

Hingoli News : हिंगोली व परभणी बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात किंचित चढ-उतार होत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून दर दबावातच आहे. दर पाच हजार रुपयांवर पोहचतील, या आशेने घरात सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. मागील आठवड्यात या दोन जिल्ह्यांत सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ४१०० ते ४५८० रुपये राहिले आहेत.

हिंगोली बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात सोयाबीनची प्रतिदिन ४०० ते ८०० क्विंटल नुसार एकूण २३५० क्विंटल आवक राहिली. तर प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५८० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. २७) सोयाबीनची ४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१५० ते कमाल ४५८० रुपये तर सरासरी ४३६५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २५) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१५० ते कमाल ४५७५ रुपये तर सरासरी ४३६२ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २४) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होती. त्यामुळे प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५७५ रुपये तर सरासरी ४३२९ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.२२) ६५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५५० रुपये तर सरासरी ४३२५ रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत मंगळवारी (ता.२३) ते गुरुवार (ता.२५) दरम्यान सोयाबीनची ५३९ क्विंटल आवक राहिली.

प्रतिक्विंटल किमान ४३५० ते कमाल ४५५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२५) १७० क्विंटल आवक होऊन किमान ४३५० ते कमाल ४५५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.२४) २०८ क्विंटल आवक झाली. तर प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४५०० रुपये तर सरासरी ४४५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२३) सोयाबीनची १६१ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४५५० रुपये तर सरासरी ४४५० रुपये दर मिळाले.

उन्हाळी सोयबीन घटले; शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा

यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे या दोन जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात बियाण्यासाठी मागणी होऊन सोयाबीनच्या दरात तेजी येईल, अशी अनेक शेतकऱ्यांना आशा आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मागील खरिपातील सोयाबीन अजून विक्री केलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT