Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : मुदतवाढीनंतर सोयाबीनचे दर दबावात; खुल्या बाजारात ४००० रुपये प्रति क्विंटल दर!

Market Update : सोयाबीनचे दर मुदतवाढीनंतरही स्थिर राहिले असून, खुल्या बाजारात याच्या दरात दबाव कायम आहे. सध्या सोयाबीनचे सरासरी दर ४००० रुपये प्रति क्विंटल मिळत असून, शेतकऱ्यांसाठी हे आव्हानात्मक ठरले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : हमीदराने शासकीय खरेदीस मुदतवाढ दिली असली तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना खासगी बाजारातच पडत्या दराने विक्री करण्याची वेळ आली असून मुदतवाढीनंतरही या बाजारातील दर वधारू शकले नाहीत. सोमवारी (ता. २०) स्थानिक बाजार समितीत सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी झाली.

राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली. तरीही स्थानिक बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे.

सोमवारी (ता.२०) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ हजार ९९५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. किमान ३८००, तर कमाल ४०५० रुपये म्हणजे सरासरी ४००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गेल्या ११ जानेवारीला ७ हजार ५३९ क्विंटल आवक होऊन किमान ३ हजार ९५०,

कमाल ४ हजार २१२ म्हणजे सरासरी ४ हजार ८१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांत सोयाबीनच्या दरात केवळ २५ रुपयांची वाढ झाली आहे. विदर्भातील इतर बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती असून अनेक ठिकाणी सोयाबीनचे सरासरी खरेदी दर हे चार हजारांपेक्षा कमी आहेत.

‘नाफेड’ची १२ टक्के ओलाव्याची अट

यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले असले तरी खुल्या बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळत असल्याने हमीभावाने खरेदी करावी, यासाठी शेतकरी आग्रही आहेत. मात्र, ‘नाफेड’ने १२ टक्के ओलाव्याची अट घातल्याने आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या सात लाख ४९ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ दोन लाख ५ हजार ५३९ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT