soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : लातूरला सोयाबीनची आवक आणि दरही चढेच

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा बाजार समितीत होणाऱ्या आवकेच्या तुलनेत गत आठवडाभरात जास्तच झाली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा बाजार समितीत होणाऱ्या आवकेच्या तुलनेत गत आठवडाभरात जास्तच झाली. शिवाय दरही (Soybean Rate) इतर बाजार समित्यांच्या तुलनेत थोडे चढेच राहिल्याची स्थिती आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान सोयाबीनची एकूण आवक १ लाख ३ हजार ३६६ क्विंटल झाली. या सोयाबीनचे किमान दर ४९५२ ते ५६०१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान, तर कमाल दर ५८११ ते ६३५१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. सोयाबीनला सरासरी दर ५५०० ते ५९८० रुपये प्रति क्विंटल दरम्यान मिळाला. सोयाबीनची आवक १३३१९ ते १९४५८ क्विंटल दरम्यान राहिली.

जालना बाजार समितीत सोयाबीनची आठवड्यात एकूण आवक ७९ हजार ४३८ क्विंटल झाली. ११८४२ ते १९४३३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनचे किमान दर ३९०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल, कमाल दर ५७०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान तर सरासरी दर ५१५० ते ५५०० प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

बीड बाजार समितीत सोयाबीनची एकूण आवक ३ हजार ४९४ क्विंटल झाली. या सोयाबीनला किमान दर २५८३ ते ४६५१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान, कमाल दर ५५५५ ते ५७०० प्रति क्विंटल दरम्यान मिळाला. दुसरीकडे बाजार समितीत सोयाबीनचे सरासरी दर ५२८४ ते ५४८८ रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

औरंगाबाद बाजार समितीत सोयाबीनची चार वेळा मिळून ९१५ क्विंटल आवक झाली. या सोयाबीनचे किमान दर ४४०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान, कमाल दर ५५४९ ते ५,६२१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान व सरासरी दर ४९७५ ते ५२७४ रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बाजार समितीत सोयाबीनची आठवड्यातील एकूण आवक ४८० क्विंटल झाली. या सोयाबीनला किमान दर ४५०० ते ५१५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान तर कमाल दर ५६३१ ते ६००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आणि सरासरी दर ५४०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT