Soybean Rate
Soybean RateAgrowon

China Soybean : चीनची सोयाबीन आयात यंदा वाढणार

भारताबरोबर सध्या अमेरिकेचा सोयाबीन हंगाम सुरु आहे. अमेरिकेला यंदा दुष्काळाचा फटका बसल्याने सोयाबीन उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

पुणेः भारताबरोबर सध्या अमेरिकेचा सोयाबीन हंगाम (America Soybean Season) सुरु आहे. अमेरिकेला यंदा दुष्काळाचा (Drought) फटका बसल्याने सोयाबीन उत्पादन (Soybean Production) कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र युएसडीएने अंदजापेक्षा उत्पादनात काहीशी वाढ होईल, असे म्हटले आहे. पण उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहणार आहे. तर चीन यंदा सोयाबीन आयात वाढवणार आहे.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन सध्याच्या दरात विकावं का?

अमेरिकेतील सोयाबीन काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. युएसडीएने नोव्हेंबरच्या अहवालात अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात काहिशी वाढ झाल्याचे म्हटले आहे. पण उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहणार आहे. अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन १ हजार १८२ लाख टनांवर स्थिरावणार आहे. तर व्यापारी संस्थांचा अंदाज १ हजार १७६ लाख टनांचा होता.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन उत्पादकता वाढली

ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणी सुरु असताना युएसडीएनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा १ हजार १७३ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला होता. मात्र आता काढणी पूर्ण होत आल्यानं उत्पादकतेची स्थिती पुढे आली आहे. युएसडीएच्या मते यंदा अमेरिकेत ८६६ लाख एकरवरील सोयाबीनची काढणी झाली. यात १३.६६ क्विंटल उतारा मिळाला.

मात्र अमेरिकेतील जाणकारांनी युएसडीएच्या या दाव्यावर आश्चर्य व्यक्त केले. व्यापारी जगताला अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाबाबतचा मागील अंदाज राहील, असं वाटत होतं. पण उत्पादकतेतील वाढ आश्चर्यकारक आहे. पण यंदाही अमेरिकेतील सोयाबीन पुरवठा जास्त राहणार नाही. पण आता जागतिक सोयाबीन बाजाराच्या नजरा ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादनाकडे असतील. या दोन्ही देशांमध्ये आता पेरण्या जवळपास संपल्या आहेत, असंही येथील अभ्यासकांनी म्हटले आहे.

चीनचे उत्पादन वाढणार?

तिकडे चीन सरकारने यंदा देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे चीनमधील सोयाबीन उत्पादन १९० लाख टनांवर पोचेल, असा विश्वास चीनच्या सरकारला आहे. मात्र युएसडीएच्या अंदाजानुसार चीनमधील सोयाबीन उत्पादन १८४ लाख टनांवर स्थिरावेल.

चीन यंदा जास्त आयात करणार

चीन सोयाबीनचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. तर चीनची सोयाबीन आयात ९८० लाख टनांवर पोचेल, असेही युएसडीएने म्हटले आहे. मागील हंगामात कोरोना आणि वाढत्या दरामुळे चीनची सोयाबीन आयात घटली होती. मात्र यंदा चीनमधील वराहपालन, पोल्ट्री आणि खाद्यतेल उद्योगाकडून मागणी चांगली आहे. तसेच चीनमधील लाॅकडाऊन शिथिल होत आहे. त्यामुळे यंदा चीन विक्रमी सोयाबीन आयात करेल, असा अंदाज व्यक्त होत होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com