banana rates Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : केळीच्या आवकेत किंचित वाढ

Banana Rate : खानदेशात केळीच्या आवकेत मागील चार ते पाच दिवसांत किंचित वाढ झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीच्या आवकेत मागील चार ते पाच दिवसांत किंचित वाढ झाली आहे. परंतु दरही २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. केळी निर्यातीतही मागील सहा ते सात दिवसांत वाढ झाली आहे.

केळीला सणासुदीमुळे मागणी आहे. केळीचे आगार असलेल्या रावेर भागात केळीची आवक घटली आहे. या भागात सध्या फक्त ६० ते ६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. तर जळगाव जिल्ह्यात अन्य भागात मिळून रोज १०० ते ११० ट्रक केळीची आवक होत आहे. धुळ्यातही रोज तीन - चार ट्रक केळीची आवक आहे.

तर नंदुरबारातही रोज पाच ते सहा ट्रक केळीची आवक होत आहे. खानदेशात सध्या रोज १७० ते १८० ट्रक केळीची आवक होत आहे. आवक आठ ते १० ट्रकने वाढली आहे. आवकेत मोठी वाढ नाही. परंतु केळीची मागणी उत्तरेसह राज्यातील बाजारात उठाव आहे. दर्जेदार किंवा काश्मीर, आखातात पाठवणुकीच्या केळीला प्रतिक्विंटल कमाल २५०० रुपये दर शिवार किंवा खेट खरेदीत मिळत आहे.

मध्य प्रदेशात केळीची आवक बऱ्यापैकी आहे. तेथेही केळी दरात सतत वाढ झाली आहे. बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला जाहीर लिलावात रविवारी (ता. १८) कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर किमान दर तेथेही १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.

कमी दर्जाची केळी फारशी खानदेशात उपलब्ध नाही. यामुळे सध्या केळी दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. आखातातही केळीची पाठवणूक गतीने सुरू आहे. खानदेशात सध्या रोज नऊ कंटेनर केळीची आखातात पाठवणूक सुरू आहे. निर्यातक्षम केळीची मागणी मोठी आहे. परंतु हवी तेवढी केळी निर्यातीसाठी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Farming : नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक तरतुदींसाठी प्रयत्न करू

Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील चार लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

Daryapur Drought : दर्यापुरात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance : जूनमधील पीक नुकसानीसाठी साडेआठ लाख मंजूर

Smart Village : तंत्रज्ञानाचा अवलंब करून गाव समृद्ध करा : डॉ. ससाणे

SCROLL FOR NEXT