Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : खानदेशात कापूस दरात किंचित सुधारणा

Cotton Rate : खानदेशात कापूस आवकेत घट झाली आहे. दरातही किंचित सुधारणा झाली असून, खेडा खरेदीत ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापूस आवकेत घट झाली आहे. दरातही किंचित सुधारणा झाली असून, खेडा खरेदीत ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. कापसाची आवक मागील महिन्यात व या महिन्याच्या पहिल्या सात ते आठ दिवस प्रतिदिन सरासरी ५० हजार क्विंटल होती.

परंतु मागील तीन-चार दिवसांपासून कापूस आवकेत घट झाली असून, सध्या प्रतिदिन ४० हजार क्विंटल आवक खानदेशात होत आहे. खेडा खरेदीत कापसाचे दर मागील महिन्यात सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटल होते. या महिन्याच्या सुरुवातीला खेडा खरेदीतील दरात घसरण होऊन ते ६५०० रुपये प्रतिक्विंटल झाले.

यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात कापसाची विक्री करावी लागत होती. परंतु आवकेत या आठवड्यात सतत घट झाली. यामुळे कापूस दरातही सुधारणा झाली आहे. कापूस दरात मोठी वाढ खेडा खरेदीत झालेली नाही, परंतु सुधारणा दिसत असल्याने ज्यांच्याकडे कापूस आहे, त्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

शेतकऱ्यांकडील साठा संपत आला

शेतकऱ्यांकडील साठा संपत आल्यानेच कापसाची बाजारातील आवक घटली आहे. जानेवारीत आवकेत मोठी वाढ झाल्याने दरांवर सतत दबाव होता. तशीच स्थिती या महिन्याच्या पहिल्या ११ ते १२ दिवसांतही दिसत होती.

परंतु शेतकऱ्यांकडील साठा आजघडीला २० ते २२ टक्केच आहे. दरात फारशी सुधारणा होत नसल्याने अनेकांनी कापसाची विक्री केली. यामुळे गावोगावी शेतकऱ्यांकडील कापूससाठा घटला. दरात सुधारणा होत आहे, पण त्याचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांना होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT