Parbhani News : जिल्ह्यातील कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत बाजार समितीत काही आठवड्यांपासून दररोज सुमारे २५०० ते ३००० क्विंटल कापसाची आवक होत आहे. नोव्हेंबरमधील मान्सून्नोत्तर पावसात भिजलेला कापूस व न भिजलेला या दोन प्रतवारीने खरेदी केला जात आहे.
शनिवारी (ता.१०) भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले. तर न भिजलेल्या कापसाला किमान ७००० ते कमाल ७१०५ रुपये तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मान्सून्नोत्तर पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच भिजला. त्यामुळे कापसाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.
व्यापारी भिजलेल्या कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. भिजलेल्या कापसाला मागील आठवड्यात क्विंटलला किमान ५४०० ते कमाल ६५०० रुपये दर मिळाले. तर न भिजलेल्या कापसाला किमान ६८५० ते कमाल ७१०५ रुपये दर मिळाले.
मानवत बाजार समितीत गुरुवारी (ता.९) पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ६४०० रुपये तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६९४० ते कमाल ७०८० रुपये तर सरासरी ७०२० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. ८) भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ५७०० ते ६५०० रुपये तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६८७५ ते कमाल ७०२५ रुपये तर सरासरी ६९७५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ७) भिजलेल्या कापसाला ५४०० ते ६४०० रुपये तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६७५० ते कमाल ६९४५ रुपये तर सरासरी ६८५० रुपये दर मिळाले.
खेडा खरेदीत आणखी नुकसान
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात फारशी सुधारणा नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दर वाढीच्या अपेक्षेने कापसाची विक्री केलेली नाही. खेडा खरेदीचे दर बाजार समित्यांतील दरापेक्षा ५०० ते १००० रुपयांनी कमी आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.