Cotton Market : कापसाचे भाव वाढायला सुरुवात? काय झाला भाव? बाजारातील कापूस आवक आज कशी राहीली?

Cotton Rate : दराचा विचार केला तर देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आज क्विंटलमाग १०० ते २०० रुपयांची वाढ झाली होती.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील अनेक बाजारात आज कापसाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील बाजारात ही सुधारणा झाली होती. कापसाचे भाव क्विंटलमागं अनेक बाजारात १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान वाढले होते. तसेच यापुढील काळात कापसाचे भाव कापसाची बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून राहतील, असे अभ्यासकांनी सांगितले. 

देशातील बाजारात होणाऱ्या कापसाच्या आवकेचा विचार केला तर १ लाख ३७ हजार गाठी कापूस विक्रीसाठी आला होता. म्हणजेच बाजारातील आवक ७ लाख गाठींनी कमी झाली. या आकेत महाराष्ट्र आणि गुजरातचाच वाटा ८७ लाख गाठी होता. त्यातही माहाराष्ट्रातील बाजारात झालेली आवक सर्वाधिक होती. महाराष्ट्रातील बाजारात ४७ लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता. तर गुजरातमध्ये ४० लाख गाठी कापूस विकला गेला. देशातील इतर राज्यांमधील आवक ५० हजार गाठींच्या दरम्यान होती, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले.  

Cotton
Cotton Rate : कापूसदराच्या मुद्द्यावरून शेतकरी-व्यापाऱ्यांत संघर्ष

दराचा विचार केला तर देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आज क्विंटलमाग १०० ते २०० रुपयांची वाढ झाली होती. कापसाच्या कमाल आणि सरासरी भावपातळीत ही वाढ दिसून आली. किमान भाव अजही बहुतांशी बाजारांमध्ये ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यानच दिसले. सरासरी भावपातळी ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते. गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर भारतातही हा भाव मिळाला. तर राज्यातील सर्वाधिक भाव ७ हजार ५०० रुपये होता. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत हा भाव मिळाला. 

जागतिक बाजारात कपसाचा भावही वाढला. काॅटलूक ए इंडेक्स ९९.५० सेंट प्रतिपाऊंडवर पोचला. क्विंटलमध्ये आणि रुपयात सांगायचे झाले तर जागतिक बाजारात प्रत्यक्ष कापूस म्हणजेच रुई खरेदीचे भाव १८ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल होतात. तर देशात रुईचा भाव काहीसा वाढला आहे. रुईचा भाव मागील चार दिवसांमध्ये क्विंटलमागं ३०० रुपयांनी वाढला होता. रुईचा आजचा भाव १६ हजारांवर पोचला. म्हणजेच प्रत्यक्ष रुईचे खरेदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा २ हजार २५० रुपयांनी जास्त आहेत.

Cotton
Cotton Procurement Center : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीत वाढ करावी

वायद्यांमध्येही कापूस वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांनी आज ९५ सेंटचा टप्पा गाठला होता. तर सायंकाळी बाजार ९४ सेंट प्रतिपाऊंडवर होता. म्हणजेच १७ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल. तर देशातील वायदे ५९ हजार ६०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. क्विंटलमध्ये सांगायचे झाले तर हा भाव १६ हजार ७०० रुपये होतो. म्हणजेच भारताचा कापूस वायद्यांमध्येही ५५० रुपयांनी कमी आहे. 

कापसाचे भाव देशातील काही बाजारात वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावही वाढत आहेत. त्यामुळे देशातील कापसाचे भाव पुढील काळात आणखी वाढतील. पुढच्या दोन आठवड्यापर्यंत कापूस सरासरी ७ हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com