Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : केळीच्या दरात काहीशी सुधारणा

Market Update : काही दिवसांपासून केळी दरात सुरू असलेली घसरण बुधवारी (ता.२५) थांबली. एका क्विंटलमागे केळी दरात ५० ते ६० रुपयांची सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : काही दिवसांपासून केळी दरात सुरू असलेली घसरण बुधवारी (ता.२५) थांबली. एका क्विंटलमागे केळी दरात ५० ते ६० रुपयांची सुधारणा झाली आहे. खानदेशात केळी दर १५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे पोहोचले आहेत.

मध्य प्रदेशातील केळी लिलावानुसार खानदेशात केळीचे दर निश्चित केले जातात. परंतु तेथे काही दिवसांपूर्वी दरात मोठी घसरण झाली. यामुळे खानदेशातही केळी दर ८०० ते ५०० रुपयांनी एक क्विंटलमागे कमी झाले. परंतु दरात बुधवारी काहीशी सुधारणा झाली. खानदेशात थेट खरेदीत केळीला किमान १५०० व कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

केळी दरात मोठी घसरण मागील आठवड्यात सुरू झाली. सात ते आठ दिवसांपूर्वी केळी दर २००० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळत होते. परंतु अधिकची आवक व कमी उठाव यामुळे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात केळी दरात घसरण झाली. तेथे कमाल दर ३००० रुपयांवरून २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. कमी दर्जाच्या केळीचे दर तेथे १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. यामुळे खानदेशात शिवार किंवा थेट खरेदीतही केळी दरात मोठी घसरण झाली.

केळी दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांची मोठी वित्तीय हानी सुरू झाली. या स्थितीत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. परंतु जळगाव, रावेर, चोपडा आदी बाजार समित्या बघ्याची भूमिका घेत आहेत. अशातच केळी दरात बुधवारी एका क्विंटलमागे ५० ते ६० रुपयांची सुधारणा झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT