Oilseed  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Oilseed Market : विदर्भातील बाजारात तिळाचे दर स्थिर, तर भुईमुगाचे दर दबावात

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, अकोला या भागांत उन्हाळी भुईमुगास तिळाची लागवड होते. सध्या बाजारात या दोन्ही शेतीमालांची आवक वाढती असल्याचे चित्र आहे. अमरावती बाजारात भुईमूग शेंगाची दर दिवशी सरासरी ५०५ क्‍विंटल इतकी आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पॅटर्न होता. परंतु गेल्या काही वर्षांत या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्याच्या परिणामी शेंगधारणा न होणे त्यासोबतच इतरही अनेक प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत होते. त्यामुळेच या पिकाचा पिच्छा सोडत शेतकऱ्यांनी तीळ लागवडीवर भर दिला. दारव्हा तालुक्‍यातील काजीपूर हे तीळ लागवडीमुळे नावारूपास आले आहे.

त्यासोबतच महागाव तालुक्‍यातील उटी, पांढरकवडा या भागांतही तीळ लागवड होते. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात मात्र शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीत सातत्य राखले आहे. सध्या उत्पादित शेतीमालाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने भुईमुगासह तीळ विक्रीसाठी बाजारात येत आहे. अमरावती बाजारात दर दिवशी भुईमुगाची सरासरी ५०५ क्‍विंटल इतकी आवक आहे. गेल्या हंगामाच्या शेवटी भुईमुगाचे दर ५००० रुपयांवर गेले होते.

सध्या भुईमूग शेंगाचे व्यवहार ५५०० ते ६००० रुपयांनी होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात भुईमुगाचे दर प्रतिक्विंटल तीनशे रुपयांनी तेजीत होते. आता आवक वाढल्याच्या परिणामी त्यात घट झाल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी तिळाला ११,५०० ते १२,३०० रुपयांचा दर मिळत आहे. अमरावती बाजारातील तिळाची आवक ८१ क्विंटल इतकी आहे. कारंजा लाड (जि. वाशीम) बाजार समितीत देखील तिळाची आवक होत आहे.

अमरावती बाजार समितीच्या तुलनेत या ठिकाणी अधिक आवक नोंदविण्यात आली. सुमारे २१५ क्‍विंटल तिळाची आवक कारंजा बाजार समितीत होत आहे. याला ११,६०० ते १२,३९० रुपयांचा दर मिळाला. यवतमाळ बाजार समितीत देखील तिळाची आवक होत असून, याला ठिकाणी ११,५०० ते १२,३०० रुपयांनी तिळाचे व्यवहार होत आहेत. यवतमाळ बाजारात गेल्या आठवड्यात तिळाचे दर ११,७०० ते १२,८०० रुपयांवर होते. त्यात प्रति क्‍विंटल ४०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. याच बाजारात भुईमुगाला ५,३०० ते ६,१०० रुपयांचा दर मिळत आहे.

कळमना बाजारात ११ मेपासून भुईमूग शेंगाची आवक होत आहे. सध्याही आवक अवघी १० ते ३० क्‍विंटल अशी अत्यल्प आहे. आवकमध्ये चढ-उतार होत असताना या बाजारात दर मात्र स्थिर होते. ४,००० ते ४,७५० रुपये क्‍विंटलने या ठिकाणी शेंगांचे व्यवहार झाले. १८ मे रोजी दरात घसरणही झाली. ४,००० ते ४,५०० असा दर या दिवशी मिळाला. सध्या ४,७५० रुपयांवर भुईमुगाचे दर स्थिर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT