Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू
Pending Bills: सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या लक्ष्मी निवासासमोर उसबिल थकबाकीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, ‘मातोश्री शुगर’ कारखान्याने तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे बिल थकवले असून प्रशासनाने ठोस कारवाई न करता फक्त कागदी आरआरसी प्रक्रिया सुरू ठेवली आहे.