Sesame Rate : नवीन तिळाला मिळाला १२७०० रुपये भाव

Sesame Market : धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदीचा प्रारंभ शनिवारी (ता. ११) करण्यात आला. या वेळी तिळाला १२ हजार ७०० प्रती क्विंटल भाव मिळाला.
APMC Market
APMC MarketAgrowon

Amravati News : धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदीचा प्रारंभ शनिवारी (ता. ११) करण्यात आला. या वेळी तिळाला १२ हजार ७०० प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीमार्फत तीळ खरेदी सुरू केल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
धामणगाव व परिसरातील शेतकऱ्यांना तीळ या शेतीमालाची विक्री करण्याकरिता अमरावती, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी नेऊन विक्री करावी लागत होती.

शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाहेर ठिकाणी नेल्यामुळे मिळेल त्या भावात विकावा लागत होता. शेतकऱ्यांची होत असलेली कुचंबणा लक्षात घेता व शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता सचिव प्रवीण वानखडे यांच्या पुढाकाराने बाजार समितीत नवीन तीळ खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

APMC Market
Summer Agriculture : उन्हाळी मूग, तीळ, ज्वारी लागवडीकडे कल

या वेळी उपस्थित जावरा येथील तीळ उत्पादक शेतकरी भोजराज देशमुख, जुना धामणगाव येथील सचिन भारती, रफिक पठाण, बग्गी येथील सुमित खराबे, वाढोणा येथील अमोल निखाडे, नरेंद्र जूनघरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

APMC Market
Sesame Management : उन्हाळी तीळ पिकाचे व्यवस्थापन

तीळ खरेदी प्रारंभाला राधेश्याम चांडक, गिरीश भुतडा, अशोक कांकरिया, राजेश गंगन, राजेंद्र पनपालिया, अडते असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल, देवराव कापसे सचिन मुंदडा, संतोष लावती मनीष केला, प्रदीप राठी, भूषण राठी, जगदीश रॉय, अमोल रॉय, नंदलाल राठी, संतोष लाहोटी, मुकेश पनपालिया उपस्थित होते.

असा मिळाला दर

नवीन तीळ खरेदी प्रारंभ प्रसंगी शेतकरी अमोल निखाडे यांच्या तिळाला १२ हजार ६४० रुपये भाव मिळाला. जुना धामणगाव येथील शेतकरी सचिन भारती यांच्या तिळाला १२ हजार २७५ रुपये, बग्गी येथील शेतकरी मोरेश्‍वर गोळे यांच्या तिळाला सर्वाधिक १२ हजार ७०० रुपये दर मिळाला.

खरेदीदार संजय अग्रवाल, सचिन राठी, राजेंद्र अग्रवाल, सचिन राठोड इत्यादी उपस्थित होते. या वेळी बाजार समितीचे दिनेश गोमासे, नाना गाडेकर, नितीन मांडवगणे, कवीश मोहिते, दिलीप पाटील, संजय तुपसुंदरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com